ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी तंत्रज्ञानकृषी बातम्या

Nano DAP | शेतकऱ्यांनो आता खतांचा बोजा संपणार! युरियानंतर मिळणार नॅनो डीएपी, होणार मोठा फायदा

शेतकऱ्यांसाठी युरियाला पर्याय म्हणून नॅनो युरीया विकसित करण्यात आला आहे.

Nano DAP | आता नॅनो युरीया (Nano urea) विकसित केल्यानंतर शास्त्रज्ञ आता खरीप हंगामाच्या (Kharif season) तोंडावर शेतकऱ्यांसाठी नॅनो डीएपी (Nano DAP), नॅनो झिंक (Nano zinc) आणि नॅनो कॉपरवर (Nano copper) देखील कृषी क्षेत्रात (Agricultural sector) क्रांती घडवून आणण्याचे काम करत आहेत. गुजरातमधील कलोल येथे असलेल्या नॅनो बायोटेक्नॉलॉजी रिसोर्स सेंटरमध्ये (NBRC) यावर काम सुरू आहे. जेणेकरून शेतकऱ्यांना 50 किलोच्या पोत्याची उचल आणि चढ्या भावातून काहीसा दिलासा मिळेल.

नॅनो युरिया व्यतिरिक्त नॅनो झिंक, नॅनो कॉपर आणि नॅनो डीएपी एनबीआरसीमध्ये विकसित केले गेले आहेत. त्यांच्या क्षेत्रीय चाचण्याही जवळपास पूर्ण झाल्या आहेत. हे सर्व खत नियंत्रण आदेशात समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुरू आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर उत्पादन सुरू होईल. कमी वाहतूक खर्चामुळे हे नॅनो खत शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढवण्यास उपयुक्त आहे.

वाचाDrone Subsidy | शेतकऱ्यांनो आता फवारणी होणार अजून सोपी, कारण सरकारच ‘या’साठी देणार 5 लाखांच अनुदान

नॅनो डीएपी चाचणी
नॅनो डीएपीची चाचणी देशातील 1100 ठिकाणी सुमारे दोन डझन पिकांवर करण्यात आल्याचे सांगण्यात आले. पारंपारिक डीएपी, झिंक आणि कॉपरपेक्षा ते किती चांगले आहे हे पाहण्यासाठी विविध पिकांवर त्याची चाचणी घेण्यात आली आहे. नॅनो युरियाप्रमाणेच डीएपी आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचेही परिणाम चांगले आले आहेत.

लोकांना होणार रोजगार उपलब्ध
या सर्व युनिट्सची दररोज 2 लाख बाटल्यांची उत्पादन क्षमता आहे. त्यांच्या स्थापनेसाठी एकूण 3000 कोटींची गुंतवणूक जाईल. त्यापैकी 720 कोटींची रक्कम आधीच वाटप करण्यात आली. या प्लांट्समधून सुमारे 1000 लोकांना रोजगार मिळेल, असा दावा केला जात आहे. सुरुवातीच्या टप्प्यात नॅनो डीएपी आणि नॅनो झिंक, कॉपर, सल्फर बोरॉनच्या बाटल्या गुजरातच्या कलोल युनिटमध्ये तयार केल्या जातील.

वाचाCotton Farming | कापूस लागवडीचे आधुनिक तंत्रज्ञान! जाणून घ्या सविस्तर माहिती…

2018 मध्ये नॅनो खतासाठी केंद्राची स्थापना
31 मे 2021 रोजी नॅनो यूरिया लाँच करण्यात आली. एक 500 मिली बाटली युरियाच्या 45 किलो बॅगच्या समतुल्य आहे. त्याला यश मिळू लागल्यावर इफकोने नॅनो डीएपीचे काम सुरू केले. यावर्षी शेतकऱ्यांना नॅनो डीएपीची भेटही मिळू शकते. त्याच्या फील्ड ट्रायलमध्ये चांगले परिणाम मिळत असल्याचे सांगण्यात आले आहे. नॅनो बायोटेक्नॉलॉजी रिसोर्स सेंटरची स्थापना 2018 मध्ये विविध नॅनो खतांवर संशोधन करण्यासाठी करण्यात आली.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button