ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी तंत्रज्ञानकृषी बातम्या
ट्रेंडिंग

Nano DAP Fertilizer | शेतकऱ्यांसाठी खुशखबर! डीएपी खताच्या पोत्यामागे वाचणार 750 रुपये, त्वरीत जाणून करा खरेदी…

Nano DAP Fertilizer | आजच्या काळात शेती करणे परवडण्यासारखे राहिलेले नाही. त्याचं कारण म्हणजे शेती करताना शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा वापर करावा लागत आहे. रासायनिक खते खरेदी करायचा म्हटलं की, शेतकऱ्यांना मोठ्या पैसे मोजावे लागतात. म्हणूनच शास्त्रज्ञांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कमी पैसे खर्च करावे लागावे म्हणून नवनवीन खतांचा शोध लावला जात आहे. शेतीमधील जास्तीत जास्त उत्पादन काढण्यासाठी डीएपी खताचा (Nano DAP Fertilizer) मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. आता या डीएपी खतामध्ये (Nano DAP Fertilizer) तुमचे जवळपास 750 रुपये वाचणार आहेत. चला तर मग जाणून घेऊया कसे.

वाचा: फळबाग लागवड योजनेचा लवकरच नारळ फुटणार ! शेतकऱ्यांना मिळणार अर्थसहाय्य ; अर्ज मागविण्यास झाली सुरुवात

शेतकऱ्यांचा वाचणार खर्च
शेतकऱ्यांना शेतीमध्ये उत्पादन वाढीसाठी डीएपी खताचा मोठ्या प्रमाणात वापर करावा लागतो. यासाठी शेतकऱ्यांना डीएपीच्या खतामागे जास्त पैसे खर्च करावे लागतात. आता नॅनो युरियामागे नॅनो डीएपी लिक्विड खताची निर्मिती करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना नॅनो डीएपीच्या वापराने शेती करणे अधिक सोपे होणार आहे. तसेच शेतकऱ्यांचा होणारं जास्तीचा खर्च देखील वाचणार आहे.

पोत्यामागे वाचणार 750 रुपये
नॅनो डीएपी लिक्वीड खतामुळे शेतकऱ्यांचे जवळपास 750 रुपये वाचणार आहेत. डीएपी खताप्रमाणे पोत्यात नाहीतर तर नॅनो डीएपी बाटलीत मिळत आहे. त्यासह डीएपी खत शेतात विस्कटावे लागते पण नॅनो डीएपी हे पाण्यात मिसळून फवारावे लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळही वाचणार आहे. शेतकऱ्यांनी खतापेक्षा या नॅनो डीएपीचा जास्तीत जास्त वापर करावा. जेणेकरून त्यांची आर्थिक बचत देखील होईल.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

संबंधित लेख

Web Title:Good news for farmers! A bag of DAP fertilizer will cost Rs 750, find out quickly, buy…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button