ताज्या बातम्या

Gas Connection KYC : अत्यंत महत्त्वाची बातमी! हे काम करा अन्यथा बंद होईल गॅस कनेक्शन, या तारखेपर्यंत आहे अंतिम मुदत

Gas Connection KYC :नागपूर: गॅस कनेक्शनधारकांसाठी केवायसी (ग्राहक ओळखपत्र) प्रक्रिया पूर्ण करणे आता बंधनकारक झाले आहे. ३० जूनपर्यंत केवायसी न पूर्ण केल्यास ग्राहकांचा गॅस कनेक्शन बंद होण्याची शक्यता आहे. याचबरोबर, सबसिडीचा लाभही मिळणार नाही.

अनेक ग्राहकांनी अद्याप केवायसी पूर्ण केलेली नाही, ज्यामुळे वितरकांना डेटा अपडेटमध्ये अडचणी येत आहेत. नरखेड तालुक्यातील गॅस एजन्सीने ३० जून ही अंतिम मुदत जाहीर केली आहे.

सबसिडी आणि कनेक्शनवर टांगती तलवार:

  • नियमित आणि उज्ज्वला गॅस योजना लाभार्थी ग्राहकांना ३०० रुपये सबसिडी मिळते.
  • केवायसी न पूर्ण केल्यास, ग्राहकांना या सबसिडीचा लाभ मिळणार नाही.
  • गॅस कनेक्शन देखील कायमस्वरूपी बंद होण्याची शक्यता आहे.

वाचा : Market Bulletin:हरभरा तेजी टिकून; कापूस, सोयाबीन, कांदा तसेच काय आहेत आल्याचे दर ?

केवायसीसाठी आवश्यक कागदपत्रे:

  • आधार कार्ड
  • मोबाइल क्रमांक
  • ग्राहक जोडणी पुस्तिका
  • ग्राहकांचे फेस रीडिंग (आवश्यक असल्यास)

कुठे आणि कसे करावे केवायसी?

  • ग्राहकांनी जवळच्या गॅस एजन्सीमध्ये संपर्क साधावा.
  • आधार कार्ड, मोबाइल क्रमांक आणि इतर आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवा.
  • एजन्सीमधील कर्मचाऱ्यांकडून मार्गदर्शन घ्या आणि केवायसी प्रक्रिया पूर्ण करा.

गॅस एजन्सींचे आवाहन:

गॅस एजन्सी संचालक, मीना दीपक चौधरी यांनी सर्व ग्राहकांना ३० जूनपूर्वी केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे. सबसिडी आणि गॅस कनेक्शन सुरक्षित ठेवण्यासाठी त्वरित कारवाई करण्याचा त्यांनी सल्ला दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button