ताज्या बातम्या

Modi 3.0 | नव्या मोदी सरकारचा शपथविधी ची ठरली तारीख…

Modi 3.0 |लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (NDA) स्पष्ट बहुमत मिळाल्याने देशात पुन्हा एकदा मोदी सरकार स्थापन होणार आहे. मोदींच्या या तिसऱ्या कार्यकाळाचा शपथविधी समारंभ 9 जून रोजी होणार असल्याचे समोर आले आहे. राष्ट्रपती भवनाने यासंबंधी अधिकृत निवेदन जारी केले आहे.

निवेदनानुसार, 5 जून ते 9 जून या कालावधीत राष्ट्रपती भवनाचे सर्किट-1 सर्वसामान्यांसाठी बंद राहणार आहे. या काळात राष्ट्रपती भवनात नव्या सरकारच्या शपथविधीची तयारी केली जाणार आहे.

लोकसभा निवडणुका सात टप्प्यात पार पडल्या आणि 4 जून रोजी मतमोजणी झाली. एनडीएने सुरुवातीपासूनच आपली आघाडी कायम ठेवली होती, मात्र नंतर इंडिया आघाडीच्या जागा वाढल्या. भाजपच्या जागा कमी झाल्यामुळे त्यांना स्वबळावर बहुमत मिळालेले नाही. त्यामुळे आता मित्रपक्षांसोबत मिळून त्यांना सरकार स्थापन करावे लागणार आहे. एनडीए आणि इंडिया आघाडीमध्ये अनेक ठिकाणी चुरस पाहायला मिळाली.

नव्या सरकारच्या शपथविधी सोहळ्यासाठी राष्ट्रपती भवन 9 जूनपर्यंत सर्वसामान्यांसाठी बंद राहणार आहे. राष्ट्रपती भवनाच्या निवेदनानुसार, मंत्रिपरिषदेच्या शपथविधी समारंभाच्या तयारीमुळे 5 ते 9 जून 2024 या कालावधीत सर्किट-1 बंद राहील.

एनडीए सध्या 290 पेक्षा जास्त जागांवर आघाडीवर आहे, त्यापैकी एकट्या भाजपला 240 जागा मिळाल्या आहेत. इंडिया आघाडीने 230 जागांवर आघाडी मिळवली आहे, यामध्ये काँग्रेसला 100 जागांवर आघाडी मिळाली आहे. महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशमध्ये भाजपला सर्वाधिक नुकसान झाले आहे. 2019 च्या तुलनेत भाजपच्या जागांमध्ये घट झाली आहे.

लोकसभा निवडणुकीत एनडीएच्या विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील जनतेचे आभार मानले. ते म्हणाले, “देशातील जनतेने सलग तिसऱ्यांदा एनडीएवर विश्वास व्यक्त केला आहे. भारताच्या इतिहासातील हा अभूतपूर्व क्षण आहे. या प्रेम आणि आशीर्वादासाठी मी माझ्या कुटुंबियांना प्रणाम करतो. मी देशवासियांना खात्री देतो की त्यांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही नवीन ऊर्जा, नवीन उत्साह आणि नवीन संकल्प घेऊन पुढे जाऊ. मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो आणि सर्व कार्यकर्त्यांचे समर्पण आणि अथक परिश्रमाबद्दल त्यांचे अभिनंदन करतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button