lang="en-US"> MNREGA Job Card | मोठी बातमी ! मनरेगा जॉब कार्ड रद्द; गैरवापर करणाऱ्यांवर कारवाई जाणून घ्या सविस्तर ...

MNREGA Job Card | मोठी बातमी ! मनरेगा जॉब कार्ड रद्द; गैरवापर करणाऱ्यांवर कारवाई जाणून घ्या सविस्तर …

MNREGA Job Card | Big news! Cancellation of MNREGA Job Card; Know action against abusers in detail...

MNREGA Job Card | गेल्या दोन वर्षांपासून केंद्र सरकारने लाखो मनरेगा जॉब कार्ड रद्द करण्याची मोहीम हाती घेतली आहे. यामागील प्रमुख कारण म्हणजे योजनाचा लाभ घेणाऱ्यांनी केलेली फसवणूक. सरकारने दिलेल्या माहितीनुसार, २०२१-२२ आणि २०२२-२३ या आर्थिक वर्षांत तब्बल १० लाखापेक्षा जास्त (MNREGA Job Card ) जॉब कार्ड रद्द करण्यात आली आहेत.

यामध्ये उत्तर प्रदेश राज्यात सर्वाधिक फसवणूक झाल्याचे आढळून आले आहे. २०२१-२२ मध्ये ६७,९३७ तर २०२२-२३ मध्ये २.९६ लाख बनावट कार्डे रद्द करण्यात आली. त्यापाठोपाठ मध्य प्रदेश दुसऱ्या क्रमांकावर आहे. जिथे या दोन वर्षांमध्ये अनुक्रमे ५०,८१७ आणि १.१४ लाख बनावट कार्डे रद्द करण्यात आली.

या फसवणूक प्रकरणांमध्ये बनावट कागदपत्रे सादर करून जॉब कार्ड मिळवणे, काम न करण्याचे तसेच फक्त हजेरी लावणे यासारख्या प्रकारांचा समावेश आहे. सरकार अशा फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याच्या तयारीत आहे. कायद्यानुसार, अशा गुन्ह्यांसाठी एक हजार रुपयांपर्यंत दंड ठोठावण्याची तरतूद आहे.

या कारवाईचा उद्देश मनरेगाचा लाभ खऱ्या गरजूंपर्यंत पोहोचवणे हा आहे. यासाठी आधार कार्डशी जॉब कार्ड लिंक करणे अनिवार्य करण्यात आले आहे. यामुळे डेटाबेसमध्ये असलेल्या चुकांचे निराकरण होऊन पुन्हा अशी फसवणूक होण्याची शक्यता कमी होईल.

वाचा : Bank Job | तरुणांसाठी बँकेत नोकरीची सुवर्ण संधी! 5 हजारांहून अधिक पदांसाठी अर्ज मागवले!

तुम्हीही करा तुमच्या जॉब कार्डची पडताळणी:

मनरेगा: ग्रामीण भागाचा आधारस्तंभ

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) ही भारतातील ग्रामीण भागाला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी राबवण्यात येणारी एक महत्वाची योजना आहे. या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील बेरोजगारांना १०० दिवसांच्या रोजगाराची हमी दिली जाते. या योजनेमुळे ग्रामीण भागातील लोकांचे उत्पन्न वाढले आहे आणि त्यांची जीवनशैली सुधारली आहे.

मनरेगा जॉब कार्ड रद्द करण्याची कारवाई जरी कठोर असली तरी ती आवश्यक आहे. यामुळे योजनाचा खरा लाभार्थ्यांपर्यंत पोहोचेल आणि योजनाचा उद्देश सफल होईल.

Web Title : MNREGA Job Card | Big news! Cancellation of MNREGA Job Card; Know action against abusers in detail…

हेही वाचा

Exit mobile version