ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

Agriculture | कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा व कृषी विज्ञान केंद्र घातखेड अमरावतीकडून मिलिंद गोदेंना पुरस्कार सन्मानित

नमस्कार मंडळी मी मिलिंद जि गोदे व्यवसाय युवा प्रगतिशील शेतकरी (शेतीला अनुसरून पाच जोड व्यवसाय. शेती विषयक कार्य-कृषी जिवन जैविक शेती समुह व सेंद्रिय शेती (Organic farming) समुह या माध्यमातून इंदौरला जैविक शेतीमधे प्रशिक्षण व रामेती व वनामती नागपूरला सेंद्रिय शेतीमध्ये प्रशिक्षण घेण्यात आले.

Agriculture | त्यावेळी कृषी विभाग व NGO च्या माध्यमातून शेतकऱ्याचे प्रशिक्षण घेतले. त्याचबरोबर महाराष्ट्रातील कृषी (Agriculture) विज्ञान केंद्रासोबत जुळून सेंद्रिय शेती बाबत वेबिनार घेतले. त्याचबरोबर शेतकऱ्यांसोबत (Farmer) चर्चा व वेळोवेळी मार्गदर्शन केले. जैविक बियाणे ( Organic seeds) प्रक्रिया बाबत माहिती व सरी वरंबा पद्धत, पट्टा पद्धतीने सरासरीच्या दुपट्ट पिकं (Crop) उत्पादन घेऊन एक तालुका स्तरावर बहुमान पटकावला.

वाचा: Subsidy on Fertilizer | शेतकऱ्यांसाठी खुशखबर! मोदी सरकार करणार खतांवरील अनुदानात वाढ?

शेतकऱ्यांची घेतली भेट
तसेच कृषी विभागाच्या वतीने राबविण्यात आलेला कार्यक्रम जसे बिजोत्पादन, पिकं स्पर्धा, शेती शाळा, शेतकरी सहल, सतत सोशल मीडिया माध्यमाच्या आधारे शेती विषयक लेख तयार करून स्वताची ओळख निर्माण केली. व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून दहा हजार शेतकऱ्यांसोबत शेती विषय जनजागृतीचे काम केले. तसेच काही शेतकऱ्यांसोबत महाराष्ट्र व मध्य प्रदेशमधील प्रगतिशील शेतकरी यांची भेट व मार्गदर्शन घेतले.

वाचा: Online Crop Loan | पिक कर्जाचे ऑनलाईन अर्ज सुरु, पात्र शेतकर्‍यांना मिळणार 15 दिवसातच कर्ज, जाणून घ्या आवश्यक कागदपत्रे

शेतकऱ्यांना केले मार्गदर्शन
कापुस उत्पादक शेतकरी श्री अमृतराव देशमुख यवतमाळ यांचे मार्गदर्शन मिळाले. तसेच तुर उत्पादन शेतकरी हटवार चिखली बुलढाना यांनी सेंद्रिय पद्धतीने घेतलेल्या तुरीचे रहस्य समजून घेतले. त्याचबरोबर मध्यप्रदेशात जाऊन सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण शेतकरी यांना समजावून सांगितले. मध्य प्रदेशात गहु उत्पादक शेतकरी यांच्या सोबत संवाद साधत मार्गदर्शन घेतले व तसेच प्रयोग शेतीत राबविले. यासाठी कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा व‌ कृषी विज्ञान केंद्र घातखेड अमरावती यांनी मिलिंद जि. गोदे यांना पुरस्कार देऊन सन्मानित केले.

मिलिंद जि गोदे
9423361185
[email protected]

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button