ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
ताज्या बातम्या

Maratha Reservation | मराठा आरक्षणासाठीच्या सभेला निधी कुठून? भुजबळांनी जरांगेंना सवाल जाणून घ्या सविस्तर ..

Maratha Reservation | Where does the fund for the meeting for Maratha reservation come from? Bhujbal asked Jarang

Maratha Reservation | मराठा समाजाला ओबीसींमधील कुणबी समाजाचे जात प्रमाणपत्र देऊन आरक्षण द्यावे अशी मागणी करणारे मनोज जरांगे यांच्या सभेसाठी निधी कुठून येतो, असा सवाल राज्याचे मंत्री आणि समता परिषदेचे नेते छगन भुजबळ यांनी केला आहे.

जालनातील अंतरावली गावात रविवारी होणाऱ्या या सभेत मनोज जरांगे संबोधित करणार आहेत. या सभेतून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मागण्यात येणार आहे. यावर भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

काय म्हणाले ?

भुजबळांनी म्हटले की, “100 एकरात शेती साफ करुन मैदान करताय, 7 कोटी रुपये जमा देखील केले आहेत. एवढे पैसे येतात कुठून? हे आम्हाला कळू शकत नाही.”

वाचा : Maratha Reservation | ब्रेकींग! मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले देणार नाही; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

भुजबळ म्हणाले की, “आपला मराठा समाजाला आरक्षण द्यायला विरोध नाही. मात्र, ओबीसीतून आरक्षण द्यायला विरोध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.”

भुजबळांनी ओबीसी समाजालाही आवाहन केले आहे की, “आपण 54 टक्के आहोत म्हणजेच 7 कोटी ओबीसी समाज आहोत. आपणही मोठे कार्यक्रम करायला हवेत.”

या सभेत जरांगे यांनी ओबीसी समाजाला आरक्षणात वाटेकरी करू नका, अशी मागणी केली होती. यावर भुजबळ म्हणाले की, “ओबीसी आरक्षणात कुणालाही वाटेकरी करू नका, या मागणीसाठी राज्यभर आंदोलने झाली. यातूनच मनोज जरांगेंनी ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्यावर टीका केली होती.”

हेही वाचा :

Web Title : Maratha Reservation | Where does the fund for the meeting for Maratha reservation come from? Bhujbal asked Jarang

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button