lang="en-US"> अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, काही भागात शेतकरी पेरणीला सुरुवात

Orange Alert | महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा! अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, काही भागात शेतकरी पेरणीला सुरुवात

Orange Alert |मुंबई, 26 जून: राज्यात मान्सून आता पूर्णपणे सक्रिय झाला आहे आणि अनेक भागात मुसळधार पावसाचा (Heavy Rain) इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज मराठवाडा, विदर्भ, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. यामुळे काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जारी करण्यात आला आहे.

मुंबईसह उपनगरात सकाळी पावसाला सुरुवात झाली आहे आणि येत्या 3-4 तासांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने पर्यटकांना घाटमाथ्यावर जाताना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

वाचा : Cooperative Societies Elections : सहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर, ३० सप्टेंबरपर्यंत स्थगिती

कोकण विभागातील बहुतेक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यातही धुंद पावसाची शक्यता आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

मुंबई, ठाणे, पुणे, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांनाही यलो अलर्ट (Yellow Alert) जारी करण्यात आला आहे. ज्या भागात आतापर्यंत चांगला पाऊस झाला आहे, तिथल्या शेतकऱ्यांनी शेतीच्या कामांना वेग दिला आहे आणि पेरणी सुरू केली आहे.

दुसरीकडे, काही भागात अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहेत. कृषी विभागाने शेतकऱ्यांना चांगला पाऊस झाल्याशिवाय पेरणी न करण्याचे आणि जमिनीत 6 इंच ओल झाल्यानंतरच बियाण्यांची लागवड करण्याचे आवाहन केले आहे.

Exit mobile version