हवामान

Emphasis |पावसाचा जोर वाढला! कोकण, घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा, विदर्भात वादळी वाऱ्यासह पाऊस!

Emphasis|मुंबई, २९ जून २०२४: बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाल्याने मॉन्सून सक्रिय होण्याची चिन्हे आहेत. याचाच परिणाम म्हणून राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा जोर वाढला आहे. कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे, तर विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

शुक्रवारी (ता. २८) पर्यंतच्या २४ तासांमध्ये:

  • कोकण आणि घाटमाथ्यावर तसेच पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली. चंद्रपूर जिल्ह्यातील जेवती येथे सर्वाधिक १७० मिलीमीटर पावसाची नोंद झाली.
  • कोकण, विदर्भात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला.

वाचा : Government of Maharashtra |महाराष्ट्र शासनाकडून सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी ५ हजार रुपये मदत

आज (ता. २९) पर्यंत:

  • कोकणातील रायगड, रत्नागिरी सह पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) आहे.
  • पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग, सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा, तर विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे.

इतर महत्वाचे मुद्दे:

  • बंगालच्या उपसागरातील चक्राकार वाऱ्यांच्या प्रभावामुळे ओडिशाच्या किनाऱ्यालगत वायव्य बंगालच्या उपसागरात हवेचे कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे.
  • राजधानी दिल्लीसह मध्य प्रदेश, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, उत्तराखंड, राजस्थान, उत्तर प्रदेशचा आणखी काही भाग मॉन्सूनच्या छायेत आला आहे.
  • पुढील दोन ते तीन दिवसांत देशाच्या आणखी काही भागात मॉन्सून दाखल होण्यास पोषक हवामान होत आहे.

या पावसामुळे नद्यांमध्ये पूर येण्याची शक्यता आहे. नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button