lang="en-US"> Maharashtra Police Recruitment 2024 | महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी १७ - मी E-शेतकरी

Maharashtra Police Recruitment 2024 | महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी १७ हजार जागांसाठी १७ लाखांपेक्षा जास्त अर्ज; एका पदासाठी १०२ उमेदवार

Maharashtra Police Recruitment 2024 | महाराष्ट्र राज्यात १७ हजार ४७१ पदांसाठी आयोजित केलेल्या पोलिस भरतीसाठी (Maharashtra Police Recruitment 2024) अर्ज करण्याची मुदत १५ एप्रिल रोजी संपली आहे. या भरतीसाठी तब्बल १७ लाख ७६ हजार उमेदवारांनी अर्ज केले आहेत. याचाच अर्थ, एका पदासाठी १०२ उमेदवार रिंगणात आहेत.

पहिल्यांदा मैदानी चाचणी:
यावेळी पोलिस भरतीमध्ये पहिल्यांदाच मैदानी चाचणी घेण्यात येणार आहे. यात १०० मीटर आणि १६०० मीटर धावणे (महिलांसाठी ८०० मीटर) आणि गोळाफेक यांचा समावेश आहे. उमेदवारांना या चाचणीत किमान ४०% गुण मिळवणे बंधनकारक आहे. मैदानी चाचणी उत्तीर्ण झाल्यानंतर, प्रत्येक पदासाठी १० उमेदवारांची निवड लेखी परीक्षेसाठी केली जाईल. १०० गुणांच्या या परीक्षेत ४०% गुण मिळवणे आवश्यक आहे.

मेरिट यादी आणि निवड:
मैदानी आणि लेखी परीक्षेतील गुणांचा एकत्रित विचार करून सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या उमेदवारांची मेरिट यादी तयार केली जाईल. याच मेरिट यादीनुसार पोलिस शिपायांची निवड होईल. चालक पोलिस शिपाई पदासाठी स्वतंत्रपणे वाहतूक विषयावरील चाचणी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.

वाचा: ‘आयुष्मान भारत योजने’चा नागरिकांना कोणत्या रुग्णालयात मिळतो लाभ; लगेच ‘अशा’प्रकारे पाहा

निवडणुकीमुळे उशीर:
लोकसभा निवडणुकीमुळे पोलिस अधिकारी आणि कर्मचारी निवडणूक बंदोबस्तात व्यस्त आहेत. त्यामुळे मैदानी चाचणी २० मे रोजी, लोकसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा संपल्यानंतर घेण्यात येईल, असे गृह विभागातील विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

उन्हामुळे सकाळीच चाचणी:
सध्याच्या तीव्र उन्हाळ्यामुळे दररोज सकाळी ६ ते १० या चार तासांच्या आतच मैदानी चाचणी घेण्यात येईल. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पोलिस भरतीची लेखी परीक्षा एकाच वेळी घेण्यात येणार आहे. ३० ऑगस्टपर्यंत या संपूर्ण भरती प्रक्रियेचा पूर्णत्व करण्याचे नियोजन आहे आणि ऑक्टोबरअखेर निवड झालेल्या उमेदवारांचे प्रशिक्षण सुरू होईल.

हेही वाचा: राज्यात ‘या’ 7 जिल्ह्यांत विजा अन् मेघगर्जनेसह पाऊस; तर 11 जिल्ह्यांना उष्णतेची लाटेचा इशारा

भरतीतून ७१ कोटींचे उत्पन्न:
पोलिस भरतीसाठी अर्ज करताना शुल्क म्हणून खुुल्या प्रवर्गासाठी ४५० रुपये आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३५० रुपये निर्धारित करण्यात आले होते. १७ लाख ७६ हजार उमेदवारांनी अर्ज केल्याने यातून सरकारला ७१.०४ कोटी रुपयांचे उत्पन्न झाले आहे.

पोलिस भरती २०२४: महत्वाचे मुद्दे:

Exit mobile version