lang="en-US"> महाराष्ट्रात मुसळधार पाऊस! अनेक जिल्ह्यांना अलर्ट आंबोलीत पर्यटनाची रेलचेल

Orange Alert| महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा! अनेक जिल्ह्यांना ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी, आंबोलीत वर्षा पर्यटनासाठी पर्यटकांची गर्दी|

Orange Alert|मुंबई, 30 जून 2024: महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढत आहे. हवामान विभागाने (IMD) आज अनेक जिल्ह्यांना ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी केला आहे. कोकणात रायगड आणि रत्नागिरी यांना ऑरेंज अलर्ट तर मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, सातारा, सिंधुदुर्ग आणि विदर्भातील सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मुंबईत पावसाचा जोर वाढणार:

IMD च्या अंदाजानुसार, मुंबईत आज आणि उद्या (1 जुलै) मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर, 2 आणि 3 जुलै रोजी हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज आहे. नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

वाचा : Cotton, Soybean Subsidy : कापूस, सोयाबीनसाठी ५ हजार रुपये, दुधासाठी अनुदान; वीजबिल माफी

आंबोलीत वर्षा पर्यटनासाठी पर्यटकांची गर्दी:

महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून ओळख असलेल्या आंबोलीत पावसाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढली आहे. डोंगर-दऱ्यातून कोसळणारे ढग, धबधबे, रिमझिम पाऊस आणि दाट धुक्यामुळे पर्यटक आकर्षित होत आहेत.

शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी:

पावसामुळे शेतीच्या कामांना वेग आला आहे. ज्या भागात चांगला पाऊस झाला आहे, तिथे शेतकरी पेरणी करत आहेत. मात्र, अद्यापही काही भागात पाऊस कमी झाला आहे. अशा भागात चांगल्या पावसाची गरज आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांना चांगला पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये, असे आवाहन केले आहे.

Exit mobile version