ताज्या बातम्या

Grant| दुध उत्पादकांचा आंदोलन तीव्र! ५ रुपये अनुदान पुरेसे नाही, किमान १० रुपये कायमस्वरूपी द्या, अशी मागणी!

Grant |अहमदनगर, २९ जून २०२४: दुधाचे भाव कोसळल्याने त्रस्त झालेल्या दूध उत्पादकांनी आज पुन्हा आंदोलन तीव्र केले आहे. ५ रुपये प्रति लिटर अनुदान हे तात्पुरते उपाय असून, दुग्धव्यवसायात (dairy business)दीर्घकालीन सुधारणा घडवून आणण्यासाठी किमान १० रुपये प्रति लिटर कायमस्वरूपी अनुदान देणे आवश्यक आहे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.

माकप नेते डॉ. अजित नवले यांनी काल अकोल्यात आयोजित आंदोलनात म्हटले की, “केवळ ५ रुपये अनुदानामुळे दूध उत्पादकांना कोणताही फायदा होत नाही. यामुळे दुधाचे भाव वाढत नाहीत आणि त्यांचे उत्पन्न कमीच राहते. सरकारने त्वरित १० रुपये प्रति लिटर कायमस्वरूपी अनुदान देण्याची घोषणा करावी.”

दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष श्री. रघुनाथ पाटील यांनी, “राज्यभरातील दूध उत्पादक शेतकरी ५ रुपये अनुदानाचा निषेध करत आहेत. हे अनुदान अपुरा आणि अकार्यक्षम आहे. सरकारने त्वरित( Immediately) यात बदल करून, शेतकऱ्यांना पुरेसा दिलासा देणारा निर्णय घ्यावा,” असे आवाहन केले आहे.

वाचा :orange Alert | महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा! अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, काही भागात शेतकरी पेरणीला सुरुवात

आंदोलनकर्त्यांनी अशाही मागण्या केल्या आहेत:

  • देशांमध्ये पडून असलेली दूध पावडर निर्यात करण्यासाठी प्रोत्साहन अनुदान द्यावे.
  • केंद्र सरकारने दूध पावडर आयात करण्याची परवानगी मागे घ्यावी.
  • दूध उत्पादकांना मिळणाऱ्या अनुदानावर कोणत्याही प्रकारच्या अटी-शर्ती लादू नये.
  • दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या किंमतीत वाढ करावी.

दुग्धव्यवसायातील अस्थिरतेमुळे राज्यातील हजारो दूध उत्पादक शेतकरी संकटात( in crisis)सापडले आहेत. सरकारने या समस्येवर त्वरित आणि ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button