शासन निर्णय

Decision |विधवा महिलांना वारसा प्रमाणपत्रासाठी 75 हजारांऐवजी फक्त 10 हजार रुपयांचे शुल्क; मंत्रिमंडळ बैठकीतील मोठे निर्णय

Decision | विधवा महिलांसाठी दिलासा:

  • पतीच्या मृत्यूनंतर (After death) मिळकतीवर वारस म्हणून नोंदणीसाठी लागणाऱ्या 75 हजार रुपयांच्या शुल्कात कपात करून 10 हजार रुपये करण्यात आली आहे.

आरोग्य:

  • चंद्रपूर जिल्ह्यात 100 खाटांचे कर्करोग रुग्णालय सुरू करण्यासाठी चंद्रपूर कॅन्सर (Cancer) केअर फाऊंडेशनला जमीन भाडेपट्ट्याच्या करारनाम्यासाठी द्याव्या लागणाऱ्या मुद्रांक शुल्कातून सूट देण्यात आली आहे.

वाहतूक:

  • विरार ते अलिबाग मल्टिमोडल कॉरिडॉरच्या भूसंपादनासाठी 22 हजार 250 कोटी रुपये आणि पुणे रिंग रोड पूर्व प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी 5 हजार 500 कोटी रुपये कर्जासाठी हुडकोकडून मान्यता.

वाचा :  Orange Alert | महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा! अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, काही भागात शेतकरी पेरणीला सुरुवात

मुंबई मेट्रो:

  • मुंबई मेट्रो-3 लवकर सुरू करण्यासाठी राज्य शासनाच्या (of State Govt) हिश्याची 1163 कोटी रुपये थेट मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनला देण्यात येतील.

महालक्ष्मी रेसकोर्स:

  • महालक्ष्मी रेसकोर्सवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे सेंट्रल पब्लिक पार्क (Central Public Park) उभारण्यात येणार आहे.
  • मे. रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबला दिलेल्या भूखंडाच्या भाडेपट्ट्यात सुधारणा करण्यात आली आहे.
  • रेसकोर्सवर कुठल्याही स्वरुपाचे बांधकाम होणार नाही.

ग्राम विकास:

  • मुख्यमंत्री ग्रामसडक (village road) योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात 3 हजार 909 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची दुरुस्ती आणि सुधारणा करण्यासाठी आशियाई विकास बँकेकडून 310 मिलियन डॉलर्सचे कर्ज घेण्यास मान्यता.

या व्यतिरिक्त, मंत्रिमंडळ बैठकीत इतर अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button