ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
ताज्या बातम्या

MH Budget | महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२२ सादर: कृषिक्षेत्रात अनुदानाचे उधाण, प्रत्येकी २५ हजारांनी वाढणार अनुदान! जाणून घ्या मुद्देसुत अर्थसंकल्प २०२२!

MH Budget | आज राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प जाहीर केला आहे. आर्थिक वर्ष २०२२-२३ हा महाआघाडी सरकारचा तिसरा अर्थसंकल्प आज विधिमंडळात सादर झाला आहे.

काय घोषणा केल्या आहेत ते पाहूया पुढीलप्रमाणे-

अनुदान:

. मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे अनुदान २५ हजारांनी वाढणार; ५० हजारावरून ७५ हजार होणार

२. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकरी बांधवांना ५० हजारांचे अतिरिक्त अनुदान.

३. महिला शेतकरी सक्षमीकरण; महिला शेतकरी योजनेअंतर्गत महिलांचा सहभाग ३० टक्क्यावरून ५० टक्केपर्यंत वाढवण्यात येणार.

संशोधन कार्य वाढणार:

१. वर्ध्यानजीक हिंगोलीमध्ये बाळासाहेब ठाकरे कृषी संशोधन केंद्राची स्थापना करण्यात येणार आहे.

२. कोंकण आणि परभणी कृषी विद्यापीठांना संशोधनासाठी प्रत्येकी ५० कोटी रुपयांचा अधिक निघी जाहीर.

३. अन्नप्रक्रिया योजना राबवल्या जाणार.

वाचाFertilizer’s Price | पुतिनची यावेळी शेतकऱ्यांना डायरेक्ट धमकी! खतांवर गदा! “या” कारणामुळे शेती करणे होऊ शकते कठीण!

सिंचन:

१. १०४ सिंचन प्रकल्प होणार २ वर्षांच्या कालावधीत पूर्ण.

. पंतप्रधान सिंचन प्रकल्प योजनेतून ११ प्रकल्प करणार पूर्ण.

३. सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी जलसंपदा विभागाला १३ हजार २५२ कोटींचा निधी देणार.

वीज:

१. गतवर्षी नियमित वीजबिल भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांचे अनुदान घोषित करूनही लागू करता आले नाही; ते अनुदान यावर्षीपासून सुरु.

. कृषी पंपांना वीज पुरवठ्यासाठी गोसीखुर्द प्रकल्पासाठी ५५३ कोटी ६० हजार मंजूर.

PM Kisan | शासनाचा लेट पण थेट निर्णय ! खरीप पीक विमा योजनेचा चक्क ८६५.९५ कोटी निधी लवकरच वितरित होणार; जाणून घ्या सविस्तर बातमी..

पीक अनुदान:

१. भरड धान्यावर विशेष भर देणार.

२. हळद पिकासाठी विशेष निधी.

३. कापूस पिकासाठी १०० कोटींचा निधी.

४. सोयाबीन पिकासाठी १००० कोटींचा विशेष निधी.

विमा:

पीक विम्यासाठी केंद्र सरकारला मागितली आहे मदत; केंद्र सरकारकडून न मिळाल्यास दुसऱ्या पर्यायांचा करण्यात येणार विचार.

पशुपालन:

१. उत्तर भारतीय देशी गाई आणि बैलांच्या संख्येत वाढ होण्यासाठी ३ मोबाइल वॅन मंजूर.

२. पशुवैद्यकीय रुग्णालय, मुंबईला १० कोटींचा निधी.

३. प्रत्येकी एक शेळी प्रकल्प, प्रत्येक महसूल विभागात.

. सुदृढ पशुपालनासाठी ३ फिरत्या प्रयोगशाळा मंजूर.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा णि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा..

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे हि वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button