lang="en-US"> Crop Insurance | शेतकऱ्यांसाठी खुशखबर! काढणीपश्चात नुकसान झालेल्या पिकांचा ‘इतक्या’ कोटींचा विमा खात्यात जमा

Crop Insurance | शेतकऱ्यांसाठी खुशखबर! काढणीपश्चात नुकसान झालेल्या पिकांचा ‘इतक्या’ कोटींचा विमा खात्यात जमा

Crop Insurance | गेल्यावर्षी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यासाठी शेतकऱ्यांना शासनाच्या माध्यमातून अतिवृष्टी भरपाई म्हणून निधी देण्यात आला होता. त्याचबरोबर प्रधानमंत्री पिक विमा (Crop Insurance) योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास विमा परतावा मिळतो. शेतात पीक उभं असतानाच नुकसान झाल्यास पिकाचा विमा (Crop Insurance) मिळत नाही तर काढणी पश्चात पावसामुळे पिकाचे नुकसान झाल्यावरही विमा परतावा मिळतो.

वाचाYojana | शेतकऱ्यांसाठी खुशखबर! आता शेळीपालनासाठी 100 टक्के अनुदान, ‘या’ दोन योजनांना मंजुरी

शेतकऱ्यांच्या खात्यावर विमा जमा
नुकताच आता शेतकऱ्यांच्या खात्यावर काढणीपश्चात नुकसान झालेल्या पिकांचा विमा परतावा खात्यावर जमा करण्यात आला आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात काढणी पश्चात पिकांचे नुकसान झाले होते. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी विमा कंपन्यांकडे याची माहिती दिली होती. आता याचाच विमा परतावा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला आहे.

कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळाला विमा?
अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना काढणीपश्चात नुकसान झालेल्या पिकासाठी विमा परतावा देण्यात आला आहे. परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाला हा मोठा फटका बसला होता. गेली सहा महिने शेतकरी या विम्याच्या प्रतीक्षेत होते. अखेर आता शेतकऱ्यांच्या खात्यात या विम्याची रक्कम जमा झाली आहे.

वाचा: आता शेतकऱ्यांची फसवणुक थांबणार! ‘या’ सॉफ्टवेअरमुळे बनावट अंगठ्यांना बसणार आळा

किती विमा झाला जमा?
काढणीपश्चात नुकसान झालेल्या 13,406 शेतकऱ्यांनी पूर्वसूचना पीक विमा कंपनीकडे दिलेल्या. यातील 7,152 प्रस्ताव कंपनीद्वारे मंजूर करण्यात आले होते. आता या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात शुक्रवारी रात्री 10 नंतर 12.26 कोटींचा परतावा जमा करण्यात आला आहे. ज्याची माहिती कंपनीद्वारा देण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Exit mobile version