ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

Loan | कधी होणार थकीत कर्ज माफी? कधी मिळणार प्रोत्साहनपर अनुदान ? शेतकऱ्यांनी केला राज्यसरकारला प्रश्न

Loan | राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मानित कर्ज योजना राबवण्यात आली होती. यात शेतकऱ्यांचे कर्ज देखील माफ करण्यात आले होते. परंतु यासाठी बहुतांश शेतकरी पात्र असून देखील त्याची आद्याप कर्ज माफी झालेली नाही, आणि कर्जाचे (Loan)हफ्ते देखील नील झालेले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना नवीन कर्ज देखील घेता येत नाही आणि जुनी कर्ज भरता देखील येत नाही.

परंतु याउलट आपण जर पाहिलत तर महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजने अंतर्गत नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 प्रोत्साहनपर अनुदान दिले जात आहे. हे अनुदान थेट राज्याच्या मुख्मंत्र्यांनच्या माध्यमातून अर्थसंकल्प (Budget 2023)अधिवेशनात 31 मार्च 2023 पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जाईल असे सांगण्यात आले आहे. परंतु आजुन देखील बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यात हे अनुदान जमा झालेले नाही किंवा त्यांचे नाव देखील त्या यादीत आलेले नाही. अश्या परिस्थितीत काय होणार हा प्रश्न राज्यातील सर्वच शेतकऱ्यांना पडला आहे. याच सर्व पार्श्भूमीवर आज झालेल्या अर्थसंकल्प अधिवेशनात विरोधी पक्षनेते आंबादास दानवे यांनी हा प्रश्न उपस्थित केला.

आत्महत्या ग्रस्त शेतकरी जिल्ह्यांना कधी मिळणार अनुदान?

महाराष्ट्र राज्यात आत्महत्या ग्रस्त असे 14 जिल्हे आहेत. परंतु यात यवतमाळ हा महत्वाचा जिल्हा आहे. कारण सर्वात जास्त आत्महत्या ह्या यवतमाळ जिल्हयात झाल्या आहेत. यवमाळमध्ये सुमारे 1,28,000 शेतकरी हे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मानित कर्ज योजनेत पात्र असून देखील आद्यप कर्ज माफी झालेली नाही. जवळ जवळ 3,89,000000 कोटी रुपये अद्यापही वितरीत होणे बाकी आहे. त्याच बरोबर नियमित कर्जाची परतफेड करणारे शेतकरी हे अजूनही प्रोत्साहनपर अनुदानाच्या प्रतिक्षेत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना अनुदान कधी दिले जाईल असा प्रश्न राज्यातील सर्वच शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

एप्रिल महिन्यात केले जाईल पोर्टल सुरू

2017 मध्ये थकीत कर्ज माफीसाठी जे शेतकरी पात्र आहेत त्यांच्यासाठी एप्रिल महिन्यात पोर्टल सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री महोदयांकडून देण्यात आली आहे. तसेच आपण जर पाहिलत तर 2017 ची कर्जमाफी ही 2019, 2020 किंवा 2021पर्यंत व्हायला हवी होती. परंतु ही कर्ज माफी अद्यापही वितरीत झालेली नसून दुसरी कर्जमाफी जाहीर करण्यात आली असून शेतकरी अजूनही 2017 च्या कर्जमाफीच्या प्रतिक्षेत आहेत.

31 मार्च पर्यंत येणार रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात

राज्यात जे शेतकरी नियमित कर्जाची परतफेड करतात आश्या शेतकऱ्यांसाठी राज्यसरकारकडून 1 हजार 14 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच ही प्रोत्साहनपर रक्कम 31 मार्च 2023 पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web title : When will the outstanding loan waiver? When will the incentive grant? Farmers questioned the state government

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button