ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

Loan | दुष्काळात तेरावा महिना! आता ‘ही’ बँक शेतकऱ्यांकडून करणार आजपासून कर्जाची वसुली; तुम्ही तर घेतलं नाही ना?

Loan | आपला भारत देश हा कृषिप्रधान देश आहे. देशातील निम्म्यापेक्षा अधिक नागरिकांचा उर्दनिवाह हा शेती व्यवसायावर (Business) अवलंबून आहे. तरी देखील शेती करणं इतकं सोपं आहे का? कारण शेतकऱ्यांना शेतीत दिवसरात्र कष्ट करण्यासोबतच पैसा (Financial) देखील ओतावा लागतो. तेव्हा कुठे पीक बहरायला मदत होते. तर दुसरीकडे हवामान (Weather Update) चांगले असेल तर फायद्याचं. नाहीतर अतिवृष्टी, पुर परिस्थिती, दुष्काळ यासारख्या समस्यांमुळे पिकाचे (Crop Insurance) नुकसान होत ते वेगळंच. यामुळे हातातोंडाशी आलेला घास शेतकऱ्यांकडून हिरावून घेतला जातो.

बँक कर्ज वसुली मोहीम
या सर्वात शेतकऱ्यांकडे पर्याय राहतो तो कर्जाचा. कर्ज काढून दिवाळी (Lifestyle) साजरी करावी. ही म्हण सामान्यांना जशी लागू होते तशी शेतकऱ्यांना कर्ज (Crop Loan) काढून शेती करावी लागते. तेव्हा कुठे शेतकरी पिकाची लागवड करू शकतात. परंतु अनेकदा शेतकऱ्यांना बँकांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करताना अडचणी निर्माण होतात. आता दुष्काळात तेरावा महिना आल्यासारखं एका जिल्हा बँकेने कर्जाची (Bank Loan) वसुली करण्यासाठी मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे.

‘ही’ बँक करणार शेतकऱ्यांकडून वसुली
नाशिक जिल्हा बँकेने कर्ज घेतलेल्या पण कर्जाची परतफेड न करणाऱ्या थकबाकीदारांकडून (Lifestyle) वसुली करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कर्जाची वसुली करण्याची मोहिम आजपासून राबवली जाणार आहे. खर तर, आता सध्या बँकेची आर्थिक खूप खराब आहे. त्यामुळे बँकेची आर्थिक पत (Financial credit) वाढविण्याकरता प्रशासकाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत.

किती आहे थकबाकी?
नाशिक जिल्हा बँकेची एकूण 2,156 कोटींची रक्कम वसुलीसाठी आहे. ज्यापैकी 1,452 कोटी इतकी रक्कम जुनी थकबाकीमधील आहे. आता या कर्जाची जास्तीत जास्त थकबाकीदारांनी परतफेड करणे गरजेचे आहे. तरचं बँकेची पुढील कारवाई टळेल. शेतकऱ्यांनी ही बाब गांभीर्याने घेणे महत्त्वाचे आहे.

Web Title: Thirteenth month in drought! Now bank will collect loans from farmers from today You didn’t take it did you.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button