lang="en-US"> लातूर : सोयाबीनच्या बियाण्यांचा तुटवडा, तर खाजगी कंपन्यांकडून शेतकऱ्यांची लूट वाचा सविस्तर बातमी…

लातूर : सोयाबीनच्या बियाण्यांचा तुटवडा, तर खाजगी कंपन्यांकडून शेतकऱ्यांची लूट वाचा सविस्तर बातमी…

Latur: Shortage of Soybean Seeds, Looting of Farmers by Private Companies Read More

सोयाबीन (Soybeans) बियाण्यांचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा निर्माण झाला असून खाजगी कंपन्यांकडून सोयाबीनच्या बियाण्यांच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ निर्माण झाली आहे, बियाण्यांच्या वाढीमुळे शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे, महाबीजचे(Of Mahabeej) दर कायम असले तरीही जिल्ह्यामध्ये महाबीज बियाणे समाप्त झाले असल्याकारणाने, शेतकरी खाजगी कंपनीचे(Of a private company) बियाणे घेण्यास लागत आहे.

[metaslider id=4085 cssclass=””]

लातूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात सोयाबीनचे उत्पादन घेतले जाते, मात्र अवकाळी पाऊस (Untimely rain) व अन्य नैसर्गिक कारणांमुळे या वर्षी सोयाबीन उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली, परिणामी बियाण्यांचा तुटवडा जाणवू लागला आहे. बाजारात महाबीज बियांनांचा स्टॉक (Stock) शिल्लक नसल्याने शेतकऱ्यांना खाजगी कंपन्यांचे बियाणे खरेदी करावे लागत आहेत. शेतकऱ्यांनी आता खाजगी कंपन्यांच्या बियाण्यांचे दर कमी करण्याची मागणी सरकारकडे केली आहे,

मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी सोयाबीनच्या दरामध्ये चांगलीच तेजी पाहायला मिळाली सध्या सोयाबीनचे दर सात हजार पाचशे रुपया पर्यंत जाऊन पोहचले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी देखील या वर्षी सोयाबीन लागवड करण्यासाठी प्राधान्य दिले आहे. मात्र सध्या खाजगी कंपनी कडून मिळणारे सोयाबीनचे बियाणे तीन हजार रुपयांच्या पुढे आहेत तसेच महाबीज बियाणे 2250 आहे.

महाबीज मंडळाकडून बियाणे आले तरी, स्टॉक(Stock) पटकन संपत आहे, पुरवठ्याच्या तुलनेत मागणी जास्त असल्या कारणाने दुकानदारांना देखील सोयाबीन बियाणे समाप्त झाली आहे असे फलक लावावे लागत आहेत अशी माहिती महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक सर्जेराव चव्हाण (Sarjerao Chavan) यांनी दिली आहे.

हेही वाचा :


1)सोयाबीन ऐवजी शेतकऱ्यांनी ‘या’ पिकाचा विचार करावा – डॉ. विद्या मानकर

2)कृषी पीक उत्पादन माहिती: आले लागवडीसाठी पोषक वातावरण तयार! चला जाणून घेवू आले लागवडीची संपूर्ण माहिती…

Exit mobile version