बाजार भाव

Market Bulletin:हरभरा तेजी टिकून; कापूस, सोयाबीन, कांदा तसेच काय आहेत आल्याचे दर ?

Market Bulletin: मार्केट बुलेटिन:

कापूस:

  • कापसाच्या वायद्यांमध्ये आज थोडी सुधारणा दिसून आली.
  • आंतरराष्ट्रीय बाजारात वायदे ७३.१७ सेंट प्रतिपाऊंडवर आहेत.
  • देशातील बाजारात वायदे ५७ हजार ८०० रुपये प्रतिबंकर आहेत.
  • बाजार समित्यांमध्ये भाव ७ हजार १०० ते ७ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल आहेत.
  • बाजारातील आवक कमी झाल्याने भाव सुधारले आहेत.
  • पुढील काही दिवस अनिश्चितता कायम राहू शकते.

सोयाबीन:

  • आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडच्या वायद्यांमध्ये नरमाई.
  • सोयाबीनचे वायदे ११.५३ डाॅलर प्रतिबुशेल्सवर आहेत.
  • सोयापेंडचे वायदे ३४१ डाॅलर प्रतिटनांवर आहेत.
  • देशातील बाजारात सरासरी भाव ४ हजार १०० ते ४ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल आहेत.
  • ही स्थिती काही दिवस कायम राहू शकते.

वाचा : अटल पेन्शन योजना: आता दरमहा मिळवा 5,000 रुपये पेन्शन!

कांदा:

  • कांद्याच्या भावात मागील दोन दिवसांत चढ उतार.
  • नाफेडची खरेदी, चांगली मागणी आणि कमी आवक यांमुळे भावाला आधार.
  • सरासरी भाव २५०० ते ३००० रुपये प्रतिक्विंटल.
  • उत्पादन कमी, निर्यातबंदीमुळे देशातच कांदा.
  • पुढील काळात आवक कमी होण्याची शक्यता.

हरभरा:

  • आयात शुल्क काढून आणि स्टाॅक लिमिट लावूनही भाव वाढीला.
  • देशातील बहुतांशी बाजारात ६ हजार रुपयांपर्यंत भाव.
  • सरासरी भाव ५ हजार ८०० ते ६ हजार २०० रुपये प्रतिक्विंटल.
  • पुढील काही आठवडे तेजी कायम राहण्याची शक्यता.

आले:

  • मागील वर्षभर चांगल्या भावामुळे नवीन हंगामात लागवडीसाठी बियाण्याला मागणी.
  • देशातील बाजारात भाव टिकून आहेत.
  • कमी आवकमुळे सरासरी भाव ६ हजार ते १० हजार रुपये प्रतिक्विंटल.
  • पुढील काळात भावाला आधार मिळण्याची शक्यता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button