lang="en-US"> खरीप पिकांच्या एमएसपीमध्ये केंद्र सरकारने केली मोठी वाढ,

MSP| शेतकऱ्यांसाठी खुशखबर, एनडीए सरकारने वाढवला हमीभाव, 14 पिकांच्या MSP ला मंजुरी

MSP| नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीनंतर एनडीए सरकारने शेतकऱ्यांसाठी आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मान्सून सुरू होण्याआधी सरकारने शेतकऱ्यांच्या मालाच्या किंमतीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे देशभरातल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
केंद्र सरकारने खरीपच्या 14 पिकांच्या एमएसपीच्या दराला मंजुरी दिली आहे.

सरकारने धानाला 2,300 रुपये क्विंटल भाव देण्याचा निर्णय घेतला आहे, यामुळे धानाची किंमत 170 रुपयांनी वाढणार आहे. तर कापसाच्या एमएसपीमध्ये 500 रुपयांची वाढ होणार आहे, यामुळे कापसाचे दर 7 हजार 521 रुपये आणि 7 हजार 121 रुपये होणार आहेत.

वाचा : Milk | दूध : फायदे अनेक, पण जास्त प्यायल्यास काय होते नुकसान?

या पिकांच्या एमएसपीमध्ये वाढ

ज्वारी: 3 हजार 371 रूपये

मूगः 8 हजार 682 रुपये

मकाः 2 हजार 225 रूपये

तूरः 7 हजार 550 रूपये

नाचणीः 4 हजार 90 रूपये

उडीदः 7 हजार 400 रूपये

बाजरीः 2 हजार 625 रूपये

सुर्यफूलः 7 हजार 280 रूपये

भूईमूगः 6 हजार 783 रूपये

सोयाबीनः 4 हजार 892 रूपये

याशिवाय देशात शेतमालासाठी 2 लाख टनाचं स्टोरेज तयार करण्याचं काम सुरू असल्याची माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे.

Exit mobile version