ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
जॉब्स

Job Update | तरुणांसाठी सुवर्णसंधी! राज्यात ‘या’ पदावर नोकर भरतीला सुरुवात, सरकारने ‘या’ कंपन्यांवर सोपवली जबाबदारी

Golden opportunity for youth! The recruitment of employees for the post of 'Ya' has started in the state, the government has entrusted the responsibility to 'Ya' companies

Job Update | राज्यात कंत्राटी नोकर भरतीला विरोध होत आहे. तरुणांनी राज्यभरात जोरदार निषेध आंदोलने केली आहेत. राज्य सरकारने 75 हजार जागांची भरती जाहीर केली आहे. त्यापैकी 86 संवर्गातील जागा कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहेत. या भरती प्रक्रियेला तरुणांकडून मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. तरुणांच्या मते, कंत्राटी पद्धतीने नोकरीमुळे त्यांना कायमस्वरूपी नोकरी मिळण्याची संधी मिळणार नाही. तसेच, त्यांना कमी पगार आणि अन्यायकारक कामाच्या परिस्थितीचा सामना करावा लागेल.

तरुणांनी या भरती प्रक्रियेला स्थगित करण्याची मागणी केली आहे. राज्यातील विविध शहरांमध्ये तरुणांनी निषेध आंदोलने केली आहेत. नांदेड, अमरावती, जालना, वर्धा, यवतमाळ या ठिकाणी तरुणांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. मुंबईत देखील लवकरच आंदोलन होण्याची शक्यता आहे. तरुणांच्या आंदोलनामुळे सरकारची डोकेदुखी वाढली आहे. सरकारने या आंदोलनावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

कोणत्या कंपन्यांना कंत्राट देण्यात आलं?
1) अँक्सेंट टेक सर्व्हिसेस लिमिटेड
2) सी.एम.एस. आयटी सर्व्हिसेस प्रा.लि.
3) सी.एस.ई.- गव्हर्नन्स सर्व्हिसेस इंडिया लि.
4) इनोवेव आयटी इन्फ्रास्ट्रक्चर लि.
5) क्रिस्टल इंटग्रेटेड सर्व्हिसेस प्रा.लि.
6) एस-२ इन्फोटेक इंटरनॅशनल लि.
7) सैनिक इंटेलिजन्स सिक्युरिटी प्रा.लि
8) सिंग इंटेलिजन्स सिक्युरिटी सर्व्हिसेस प्रा.लि
9) उर्मिला इंटरनॅशनल सर्व्हिसेस प्रा.लि.

वाचा : पोस्ट ऑफिस मध्ये बंपर भरती! तर “नाबार्ड” मध्ये या रिक्त जागांसाठी भरती…

कंत्राटी भरती प्रक्रियेला विरोध का?
कायमस्वरूपी नोकरीची हमी नाही
कमी पगार
अन्यायकारक कामाच्या परिस्थिती
सामाजिक आणि आर्थिक असमानता
तरुणांनी या समस्यांवर सरकारने लक्ष देण्याची मागणी केली आहे.

हेही वाचा :

Web Title: Golden opportunity for youth! The recruitment of employees for the post of ‘Ya’ has started in the state, the government has entrusted the responsibility to ‘Ya’ companies

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button