ताज्या बातम्या

Exit Poll | नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान? एक्झिट पोल्सचे रोचक निकाल आणि गिरीश महाजन यांचे भविष्यवाण

Exit Poll | लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलचे (Exit Poll 2024) निकाल जाहीर झाल्यानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विविध एक्झिट पोल समोर आले आहेत.

या पोल्सनुसार नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील, असे दिसत आहे. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणारच आणि ‘चारशे पार’चा आकडासुद्धा गाठतील, असा विश्वास गिरीश महाजन यांनी व्यक्त केला.

एक्झिट पोलमध्ये महाराष्ट्रात महायुतीला कमी जागा मिळण्याचा अंदाज आहे. मात्र, किमान 35 जागा महायुतीला मिळतील, असा अंदाज महाजन यांनी वर्तवला आहे. राज्यात कमी जागा येण्याचे मुख्य कारण म्हणजे वाढती महागाई, शेतकरी प्रश्न आणि आरक्षणाचा प्रश्न असल्याचे त्यांनी सांगितले. काही ठिकाणी उमेदवार बदलायला पाहिजे होते, ते मात्र झाले नाही, त्यामुळे महायुतीच्या जागा कमी होत असल्याचे महाजन यांनी नमूद केले. त्यांच्या या विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तसेच, महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्यावरही टीका केली. खडसे कोणत्या पक्षात आहेत, हेच स्पष्ट नाही, असे महाजन यांनी म्हटले. मात्र, त्यांनी दिलेली वक्तव्ये त्यांच्या वैयक्तिक मतावर आधारित असल्याचेही त्यांनी सांगितले.

वाचा:Lok Sabha Elections in Baramati |बारामतीत लोकसभा निवडणुकीची थरारक लढाई: सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार – कोणाची होणार बाजी?

फोडाफोडीचे राजकारण जनतेला रुचले नाही- एकनाथ खडसे

एक्झिट पोलचा निकाल पाहता 350 पेक्षा अधिक जागा मिळण्याची शक्यता असल्याचे माजी मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी म्हटले. राज्यात फोडाफोडीचे राजकारण आणि शेतकऱ्यांच्या समस्या पाहता जनतेला हे फारसे रुचले नसल्याचे दिसते. त्यामुळे काही जागा कमी झाल्याचे खडसे यांनी नमूद केले. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीला आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचे खडसे म्हणाले. लोकसभा निवडणुकीच्या निकालासंदर्भात एबीपी माझा आणि सी व्होटर्सचे एक्झिट पोल जाहीर करण्यात आले आहेत. या संदर्भात राज्याचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मागील काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी काही विकासकामे केली आहेत, त्याबद्दल जनतेने त्यांना पुन्हा एकदा पाठींबा दिल्याचे दिसते. चारशे पार होईल अशी अपेक्षा नव्हती. मात्र, साडेतीनशे पार होईल असा विश्वास होता. पोल्सचा निकाल पाहता साडेतीनशे पेक्षा अधिक जागा मिळण्याची शक्यता असल्याचे खडसे यांनी म्हटले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button