ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

Crop Loan | आनंदाची बातमी! पिक कर्जाच्या व्याजावरील रक्कम परत मिळणार, जाणून घ्या कधी?

Crop Loan | शेतकऱ्यांनी भरलेल्या पीक कर्जावरील (Crop Loan) व्याजाची रक्कम अद्यापही त्यांच्या खात्यात जमा झालेली नाही. वर्षभर बँकेने शेतकऱ्यांचे पैसे वापरले तरीही व्याज देण्यास टाळाटाळ करत आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

शेतकऱ्यांकडून कर्जावरील व्याज घेतले जाते, तरीही त्यांना त्यांच्या रकमेवर व्याज का मिळत नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ३१ मार्च जवळ येताच शेतकरी कर्जफेडीसाठी धडपड करत असतात. कोणी धान्य विकून तर कोणी दागिने गहाण ठेवून कर्ज फेडतात.

जिल्हा बँकेकडून शेतकऱ्यांना पीक कर्ज शून्य टक्के व्याज दराने उपलब्ध करून दिले जाते. मात्र, प्रत्यक्षात त्यावर ६ टक्के व्याज आकारले जाते. ३१ मार्चपर्यंत कर्ज फेडल्यास हे व्याज माफी होते आणि शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होते.

वाचा| Soyabean Rates | सोयाबीन बाजारात मंदी! शेतकऱ्यांनो जाणून घ्या नेमकं कारण काय? वाचा दराचं पुढचं भविष्य…

हे व्याज दोन टप्प्यात जमा केले जाते – डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत (३%) आणि केंद्र सरकार व्याज सवलत (३%). मात्र, यासाठी शेतकऱ्यांना अनेक महिने वाट पाहावी लागते.

शेतकऱ्यांनी २०२२-२३ मध्ये घेतलेले पीक कर्ज व्याजासह ३१ मार्च २०२३ पर्यंत भरले. मात्र, वर्ष उलटूनही त्यांना व्याजाची रक्कम मिळालेली नाही. बँकेने हे पैसे वर्षभर वापरले तरीही व्याज देण्यास टाळाटाळ करत आहे.

२०२३-२४ मध्येही अनेक शेतकऱ्यांनी ३० मार्च किंवा त्यापूर्वी कर्ज भरले. त्यात व्याजाचाही समावेश होता. मात्र, ३० मार्च रोजी सायंकाळी २०२३-२४ मधील कर्जावर व्याज आकारले जाऊ नये, असे परिपत्रक जिल्हा बँकेने जारी केले. त्यामुळे शेतकऱ्यांनी भरलेल्या व्याजाची रक्कम तातडीने त्यांच्या खात्यात जमा करण्याची मागणी होत आहे.

हेही वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button