ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
ताज्या बातम्या

India Rice | सामान्यांसाठी खुशखबर! मोदी सरकारने लॉन्च केला सर्वात स्वस्त ‘भारत तांदूळ’, जाणून घ्या किती दरात मिळणार?

India Rice | Good news for common people! Modi government launched the cheapest 'Bharat Rice', know how much it will cost?

India Rice | गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेला ‘भारत तांदूळ’ आज (६ फेब्रुवारी) लाँच करण्यात आला आहे. महागाईने त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने हा तांदूळ २९ रुपये प्रति किलो दरात बाजारात आणण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय अन्न मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते दिल्लीतील कर्तव्य पथावर आज या तांदळाचे लोकार्पण करण्यात आले. ५ किलो आणि १० किलोच्या पॅकिंगमध्ये हा तांदूळ उपलब्ध असणार आहे.

या तांदळाची विक्री केंद्र भंडार, भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ (NAFED) आणि नॅशनल कोऑपरेटिव्ह कन्झ्युमर्स फेडरेशन ऑफ इंडिया (NCCF) यांच्या माध्यमातून होणार आहे. NAFED आणि NCCF यांच्याद्वारे संयुक्तपणे हा तांदूळ बाजारात आणला जाणार आहे.

वाचा | Raice man | आता आणखी एक नवा ‘राईस मॅन’, भाताच्या पिकावर करतोय नवा प्रयोग, जाणून घ्या सविस्तर

‘भारत तांदूळ’ लाँच करण्यामागे सरकारचा उद्देश महागाईला आळा घालणे आणि गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना दिलासा देणे हा आहे. तांदळाच्या किंमतीत होत असलेली वाढ रोखण्यासाठी आणि बाजारात तांदळाचा पुरवठा वाढवण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. या तांदळाच्या लाँचमुळे बाजारात तांदळाच्या किंमती नियंत्रित होण्यास मदत होईल आणि नागरिकांना स्वस्त दरात तांदूळ उपलब्ध होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

Web Title | India Rice | Good news for common people! Modi government launched the cheapest ‘Bharat Rice’, know how much it will cost?

हेही वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button