ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
ताज्या बातम्या

आर्थिक घोटाळा झाला तर पुढच्या ७२ तासांत बँक पैसे करते परत ; फक्त या गोष्टी करण्याची असते आवश्यकता ….

नवी दिल्ली : आर्थिक घोटाळे किंवा फसवणुकीचे प्रकार आजकाल जास्त पहायला मिळतात. विविध मार्गांनी सामान्य लोकांचा गैरफायदा घेऊन फसवणूक करण्याचे प्रमाण हल्ली वाढले आहे. यामध्ये लोकांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसानही होते.

असे होतात आर्थिक घोटाळे

लोकांची फसवणूक करण्यासाठी आजकाल वेगवेगळ्या पद्धती वापरल्या जातात. यामध्ये KYC साठी साठी लिंक click करा असा बँकेच्या नावाचा मेसेज पाठवून माहिती काढून घेणे, लॉटरी लागली असल्याचे सांगून लिंक क्लिक करायला लावणे, बँकेकडून खोटा कॉल करणे अशाप्रकारच्या शक्कल लढवून ग्राहकांकडून अकाउंट डिटेल्स घेतल्या जातात आणि डिटेल्स च्या सहाय्याने नकळत बँकेतून पैसे काढूनही घेतले जातात. यामुळे लोकांनी सतत जागरूक राहणे आवश्यक आहे.

अशा घटना घडल्यास करा या गोष्टी

१) सर्वात आधी बँकेला २४ तासाच्या आत याबाबत माहिती द्यावी
२) पोलिसांकडे किंवा बँकेकडे तक्रार करावी.
३) cybercrime.gov.in या वेबसाईटवर किंवा 155260 या नंबर वर ऑनलाइन फ्रॉड ची माहिती द्यावी.

ही काळजी घेणे आवश्यक

ग्राहकांनी अशा घटना आपल्यासोबत होऊ नयेत म्हणून कोणत्याही प्रकारचा ओटीपी अनोळखी लोकांसोबत शेअर करू नये.
जर तुमच्या चुकीमुळे आर्थिक घोटाळा झाला असेल तर बँक कुठल्याही प्रकारची मदत करत नाही परंतु तुमची चूक नसताना तुमच्या अकाउंट मधून पैसे गायब झाले असतील तर पुढच्या ७२ तासांच्या आत बँक पैसे खात्यामध्ये जमा करते. त्यामुळे ग्राहकांनी योग्य वेळी समयसूचकता दाखवावी व आपले नुकसान टाळावे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा णि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे हि वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button