ताज्या बातम्या

महत्वाची बातमी ! १२ ते १४ वयोगटातील मुलांचे लवकरच होणार लसीकरण व वृद्धांनाही मिळणार तिसरा डोस; पहा कस असेल नियोजन..

Covid vaccination: जगभरात कोरोनाचे संकट ओसरताना दिसत आहे. याचवेळी कोरोना लसीकरण मोहीम मात्र वेगाने सुरू आहे. येत्या १६ मार्च पासून १२ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांना देखील कोरोना लस देण्यात येणार आहे. याबाबतची माहिती आरोग्यमंत्री (health minister) मनसुख मांडवीया यांनी ट्विटर (twitter) वरून दिली आहे.

वाचा:

कोरोना प्रतिबंधक लसीबाबत नवे नियम

कोरोना प्रतिबंधक डोस बाबत काही नियम बदलण्यात आले असून आता ६० वर्षावरील कोणतीही व्यक्ती कोरोना लसीचा तिसरा डोस घेऊ शकते. त्यासाठी बनवण्यात आलेले नियम कमी करण्यात आले आहेत यामुळे आता तिसऱ्या लसीचा मार्ग आता सर्वांसाठी लवकरच खुला होण्याची शक्यता आहे.

लहान मुलांना देणार ‘ही’ लस

इतर वयोगटातील लोकांना आतापर्यंत कोवॅक्सिन किंवा कोविडशिल्ड ही लस देण्यात येत होती परंतु आरोग्य आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार आता १२ ते १४ वयोगटातील मुलांना कार्बावॅक्स लावण्यात येणार आहे. कार्बवँक्स ही रिकॉम्बिनंट प्रोटीन सब-युनिट (protin sub unit) लस असून हे स्पाइक प्रोटीन विषाणूला शरीराच्या पेशींमध्ये प्रवेश करण्यास मदत करते. या लसीचे दोन्ही डोस द्यावे लागणार आहेत. ही लस बायोलॉजीकल ई- कंपनीने (Biological e- company) तयार केली असून याची किंमत सर्वात कमी आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा णि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे हि वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button