lang="en-US"> IFCO Nano Urea | इफकोच्या नॅनो युरियाला केंद्र सरकारची मान्यता! जाणून घ्या - मी E-शेतकरी

IFCO Nano Urea | इफकोच्या नॅनो युरियाला केंद्र सरकारची मान्यता! जाणून घ्या किती महिन्यांसाठी मिळाली मान्यता?

IFCO Nano Urea | केंद्र सरकारने इफको कंपनीच्या द्रवरूप स्वरूपातील १६ टक्के नत्र असलेल्या नॅनो युरियाच्या (IFCO Nano Urea) नवीन श्रेणीला मान्यता दिली आहे. ही मान्यता पुढील तीन वर्षांसाठी वैध राहील. इंडियन फार्मर्स फर्टिलायझर को-ऑपरेटिव्ह लिमिटेड (इफको) द्वारे २०२१ मध्ये नॅनो तंत्रज्ञानाचा वापर करून प्रथमच नॅनो युरियाची निर्मिती करण्यात आली होती. त्यावेळी या युरियामध्ये नत्राचे प्रमाण ४ टक्के होते.

आता या नवीन श्रेणीमध्ये नत्राचे प्रमाण वाढवून १६ टक्के करण्यात आले आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना लवकरच हे नवे उत्पादन बाजारात उपलब्ध होणार आहे. केंद्र सरकारने मंगळवारी (१६ एप्रिल) नॅनो युरियामधील १६ टक्के नत्राबाबत शासकीय राजपत्र प्रकाशित करून खत नियंत्रण आदेशात या खताचा समावेश केला आहे.

वाचा: महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी १७ हजार जागांसाठी १७ लाखांपेक्षा जास्त अर्ज; एका पदासाठी १०२ उमेदवार

आगामी खरीप हंगामापासून शेतकऱ्यांना ते उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नवीन श्रेणीतील नॅनो युरियामध्ये २० ते ५० एनएम आकाराचे आणि हायड्रोडायनॅमिक २० ते ८० एनएम (किमान ५० टक्के घटकांचा आवश्यक आकार) अत्यंत सूक्ष्म नत्र कणांचे द्रावण असते. या युरियाची कार्यक्षमता ९० टक्के असून, पीएच ४ ते ८.५ पर्यंत असल्याचे सांगितले जाते.

हेही वाचा: ‘आयुष्मान भारत योजने’चा नागरिकांना कोणत्या रुग्णालयात मिळतो लाभ; लगेच ‘अशा’प्रकारे पाहा यादी

इफकोचे महाराष्ट्राचे विभागीय व्यवस्थापक उदय तिजारे यांनी पत्रकात म्हटले आहे की, “नॅनो युरिया हाताळणीस सोपे, किफायतशीर आणि पिकांच्या उत्पादनात आणि गुणवत्तेमध्ये लक्षणीय वाढ करणारे आहे.” शेतकऱ्यांसाठी हा एक आनंदाचा क्षण आहे. नॅनो युरियामुळे नक्कीच उत्पादनात वाढ होईल आणि त्यांच्या उत्पन्नातही सुधारणा होईल.

Exit mobile version