ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

Cotton Rates| हर्षोल्हास! कापूस वधारला, शेतकरी आनंदला दरात झाली ‘इतकी’ वाढ
शेतकरी संघटनेची ‘ही’ नाराजी

Cotton Rates| कापसाच्या दरात चढ-उतार ही काही नवी गोष्ट नाही. दर उतरला की दुःख आणि वाढला की आनंद हे साहजिकच आहे. आपल्या उत्पादनाला मिळणारे अधिकचे पैसे कुणाला आवडणार नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना हर्षोल्हास देणारी ही बातमी आहे. कापूस दरात (Cotton Price) आता वाढ झाली आहे. काही काळापूर्वी हे दर प्रतिक्विंटल 7300 रुपये ते 7400 रुपये इतके होते. कापसाचे दर आता 7700 रुपये प्रति क्विंटल झाले आहेत. यामुळे कडक उन्हाच्या बसणाऱ्या चटक्यांनी हैरान झालेल्या शेतकऱ्यांना काहीसा गारवा मिळाला आहे.

राज्यात विकला गेला इतका कापूस

चाळीसगाव, पाचोरा, पारोळा, धरणगाव, अमळनेर, बोदवड इत्यादी भागात 65 टक्के कापूस विकला गेला आहे. तसेच भुसावळ, जळगाव, मुक्ताईनगर, जामनेर या भागात 55 ते 60 टक्के कापसाची विक्री झाली आहे. खानदेशातही बऱ्याच शेतकऱ्यांनी आपला कापूस विकला आहे. धुळे, शिरपूर आणि शिंदखेडा या भागात 70 टक्के कापसाची विक्री झाली आहे.

वाचा: बाप रे! मगरीच्या तोंडात जाऊनही माणूस जिवंत, तुम्हीच पाहा विश्वास न बसणारा व्हिडिओ

अंदाज सपशेल चुकला

कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया (Cotton Association of India) ही संस्था भारतात कापूस उत्पादनाच्या क्षेत्रात काम करते. कापसाचे उत्पादन किती होणार याचा अंदाज ही संस्था जाहीर करत असते. या अंदाजाचे परिणाम बाजारातील कापसाच्या दरावर होत असतात. यंदा 400 लाख गाठींचे उत्पादन होईल असा अंदाज या संस्थेने दर्शवला होता. तो मात्र सपशेल चुकला आहे. देशभरात आत्तापर्यंत फक्त 200 लाख कापूस गाठींची आवक झाली आहे. या चुकीच्या अंदाजामुळे शेतकऱ्यांना फटका बसतो. या चुकलेल्या अंदाजामुळे आणि चुकीच्या बातम्या पेरल्यामुळे कापूस बाजार अस्थिर राहतो, दरांवर दबाव राहतो आणि यामुळे शेतकरी नाडला जातो.

वाचाही’ अट रद्द करा अन्यथा… कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मागणी, अनुदानाच्या लाभात येताहेत अडचणी

शेतकरी संघटनेची नाराजी

शेतकरी संघटनेने मात्र यावर नाराजी व्यक्त केली आहे. अशा चुकीच्या बातम्या देणाऱ्या खरेदीदार, व्यापारी व तथाकथित तज्ञांचा बंदोबस्त करावा अशी मागणी खानदेशात रघुनाथ दादा प्रणित व शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेने केली आहे. तसेच अशा व्यक्तींचा कडक बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी संघटनेचे नेते किरण पाटील यांनी केली आहे.

हेही वाचा:

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button