ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

शेतकऱ्यांसाठी सरकारने सादर केला नवीन प्रकल्प. कशा पद्धतीने शेतकरी फुड पार्क चा वापर करून फायदेशीर ठरेल नक्की वाचा..

मेगा फूड पार्क योजना :
अलिकडच्या काळात खूप सारे शेतकरी आपल्या उत्पन्नाची प्रक्रिया करत नाहीत.शेतकरी आपले अन्न पिकवतो व तसेच मिळेल त्या भावाला विकून टाकतो जर काही उत्पन्न वेळेत नाही विकले गेले किंवा त्याचा वापर नाही करता आला तर खूप साऱ्या अन्नाचं व या उत्पन्नाचा नुकसान होत असतं. शेतकरी अज्ञान असल्याकारणाने उललेले उत्पन्न प्रक्रियासाठी नेत नाही वयामुळे शेतकऱ्याला नुकसान झेलावे लागते. आज मेगा फूड पार्क स्कीम ही शेतकऱ्यांना आपल्या उत्पन्नाची प्रक्रिया करण्यास प्रोत्साहन करण्यासाठी निर्माण केली आहे. मेगा फूड पार्क योजनेचे उद्दिष्ट म्हणजे शेतकरी, प्रक्रिया करणारे आणि विक्रेत्यांना एकत्र करून शेती उत्पादनाला बाजारपेठेत जोडण्यासाठी एक यंत्रणा उपलब्ध करणे.


मेगा फूड पार्क :
मेगा फूड पार्क ही एक क्लस्टर पद्धतीची स्कीम आहे. इथे विविध प्रकाराचा मशिनरी व प्रक्रिया करण्याचे साधने उपलब्ध आहेत. शेतकऱ्यांसाठी इथे गोडाऊन सुविधा सुद्धा असते. मेगा फूड पार्क मध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे घटक असतात.या घटकांमध्ये स्वच्छता, ग्रेडिंग, सॉर्टिंग आणि पॅकिंग, ड्राय वेअर हाउस, प्री-कूलिंग चेंबर, रिपानिंग चेंबर्स, रिफर व्हॅन, मोबाइल प्री-कूलर, मोबाइल कलेक्शन व्हॅन इत्यादी सुविधा आहेत.यामध्ये चाचणी प्रयोगशाळा, स्वच्छता, प्रतवारी आणि पॅकिंग सुविधा, ड्राय वेअर हाऊसेस, नियंत्रित वातावरण कक्ष, प्रेशर व्हेंटिलेटर, आर्द्रता कक्ष, प्री-कुलिंग चेंबर्स, रिपानिंग चेंबर्स, रेफर व्हॅन, पॅकेजिंग युनिट, स्टीम जनरेटिंग युनिट्स, फूड इन्क्युबेशन कम डेव्हलपमेंट सेंटर इत्यादींसह कोल्ड चेन इन्फ्रास्ट्रक्चरची उपलब्धता आहे.


महाराष्ट्रातील मेगापार्क
महाराष्ट्रात तीन मेगापार्क आहेत. यामध्ये दोन स्थापित व एक (वर्धा अंतर्गत) प्रस्तावित आहे.
•पैठण मेगाफूड पार्क प्रा. लिमिटेड औरंगाबाद
•सातारा मेगाफूड पार्क प्रा. लिमिटेड सातारा
•वर्धा मेगाफूड पार्क प्रा लिमिटेड वर्धा अंतर्गत

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा णि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे ही वाचा –

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button