lang="en-US"> खुशखबर! पीक विमा योजनेअंतर्गत राज्य शासनाने खरीप हंगाम 2021 साठी विमा कंपन्यांना दिली ‘इतक्या' कोटींची मंजुरी... - मी E-शेतकरी

खुशखबर! पीक विमा योजनेअंतर्गत राज्य शासनाने खरीप हंगाम 2021 साठी विमा कंपन्यांना दिली ‘इतक्या’ कोटींची मंजुरी…

बदलते हवामान ,नैसर्गिक आपत्ती, अतिरीक्त पाऊस किंवा नापिकी यामुळे पिकांचे नुकसान होण्याचा धोका असतो. हाच धोका कमी करण्याच्या अनुशंगाने (PM Pik Vima Yojana )पंतप्रधान पीक विमा योजना ही सुरु करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना खरीप हंगामात येणाऱ्या पिकांमुळे आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी ही योजना राबविण्यात येते.

शेतकऱ्यांसाठी खुशखबर-

2021 मध्ये खरीप हंगामाच्या पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नूकसानाची भरपाईसाठी शेतकरी सर्वत्र मदत मागत आहेत तर आता सरकारने ती मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांची मंजूर केलेली आहे.हे नुकसान भरपाई चे दावे निकाली काढण्यासाठी देखील विमा कंपनीला निधी असलेली गरज व विमा कंपनीची मागणी विचारात घेता सन २०२१ च्या खरीप पीक विमा योजनेसाठी निधी वितरित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

वाचा: Linking Ration To Aadhar Card | सरकारने रेशन कार्ड आधार कार्डला लिंक करण्याची वाढवली तारीख, ‘या’ तारखेपर्यंत करू शकता लिंक

शासनाचा निर्णय –

शासन निर्णयानुसार पीक विमा कंपनीला राज्य शासनाचा हप्ता साठी ₹ ८६५. ९५ कोटी ईतकी रक्कम वितर्रीत करण्यास मंजुरी दिली आहे. नवीन GR मध्ये आलेल्या माहितीनुसार विमा योजने अंतर्गत शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने 865,95,58,459 /- इतकी मंजुरी दिलेली आहे. शासनाने पिक विमा कंपनी , बजाज अलियांज जनरल इन्शुरन्स कं.लि. , रिलायन्स जनरल इन्शुरन्स कं.लि. , भारतीय एक्सा जनरल इन्शुरन्स कं.लि. व एचडीएफसी जनरल ई.कं.लि. या पाच कंपन्यांना आदा करण्यासाठी भारतीय कृषी विमा कंपनीस तेवढी रक्कम देण्यात आलेली आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना ही विमा भेटल्यामुळे त्यांचे नुकसान भरपाई केली जाणार आहे.

वाचा: Bank Holidays|बँकेला एप्रिलमध्ये 9 दिवस सुट्ट्या ! वेळे अगोदर महत्त्वाची कामे करून घ्या..

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा णि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे हि वाचा:

Exit mobile version