बाजार भाव

कापसाचे चांगले दिवस सुरूच बाजारात दर तेजीत, पहा आजचे बाजारभाव..

सध्या कपासाचे भाव तेजीत आहेत. कापसाला तब्बल 10 हजाराहून अधिक भाव (Market Price) मिळत आहे. कापूस उत्पादन शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत आहे. सध्या कापसाचे उत्पादन कमी झाले आहे. यामुळे पाहिजे इतका कापूस मिळत नसल्यामुळे कापसाचे दर तेजीत (more rate)आहेत. दर कायम तेजीत राहण्याची शक्यता आहे.

वाचा –

आज वर्धा येते मध्यम स्टेपल (medium staple) कापसाची आवक 700 क्विंटल झाली. याला कमीत कमी दर 8 हजार 550 तर जास्तीत जास्त दर 10 हजार 100 आणि सर्वसाधारण दर 9 हजार 850 रुपये मिळाला आहे. 10 हजार 100 हा दर आतापर्यंतचा राज्यातील सर्वात जास्त कापूस भाजारभाव (market rates) आहे. सर्वाधिक कापसाची आवक राळेगाव येथे 6 हजार क्विंटल झाली आहे. वर्धा नंतर सिंधु सेलू येथे जास्तीत जास्त दर 10 हजार 50 रुपये प्रती क्विंटल दर मिळाला आहे.

18 जानेवारी चे बाजारभाव –

1) अमरावती – जास्तीत जास्त कापूस दर 9 हजार 950 रुपये मिळाला आहे. सर्वसाधारण दर 9 हजार 675 तर कमीत कमी दर 9 हजार 400 रुपये मिळाला.

2) हिंगोली – जास्तीत जास्त कापूस दर 9 हजार 999 रुपये मिळाला आहे. सर्वसाधारण दर 9 हजार 924 तर कमीत कमी दर 9 हजार 849 रुपये मिळाला.

3) सावनेर – जास्तीत जास्त कापूस दर 9 हजार 800 रुपये मिळाला आहे. सर्वसाधारण दर 9 हजार 750 तर कमीत कमी दर 9 हजार 700 रुपये मिळाला.

4) सेलू – जास्तीत जास्त कापूस दर 10 हजार 50 रुपये मिळाला आहे. सर्वसाधारण दर 9 हजार 995 तर कमीत कमी दर 9 हजार 95 रुपये मिळाला.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा णि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे हि वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button