कृषी बातम्या

शेतकऱ्यांसाठी अलर्ट! गोगलगायीचा प्रादुर्भाव वाढतोय, वेळीच घ्या उपाय!

Alert | महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये सोयाबीन, कापूस, भाजीपाला आणि विविध फळबागेमध्ये शंखी गोगलगायीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. रोप अवस्थेतच गोगलगायी (snail) हल्ला करते आणि पिकांचे मोठे नुकसान करते. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्वरित कारवाई करणे गरजेचे आहे.

गोगलगायी ओळखणे:

  • ही निशाचर (nocturnal) किड आहे, रात्रीच्या वेळी सक्रिय असते.
  • ती पानासहीत पूर्ण रोप खाऊन टाकते.
  • शंख असलेला मऊ, चिवट शरीर.

वाचा : OnlinePassport | आता घरबसल्या मिळवा पासपोर्ट! ऑनलाईन अर्ज आणि प्रक्रिया जाणून घ्या सविस्तर

नियंत्रण उपाय:

  • शेताचे बांध स्वच्छ ठेवा: गोगलगायी लपण्यास जागा मिळू नये.
  • गोगलगायी गोळा करा: सायंकाळी किंवा सकाळी गोगलगायी गोळा करून साबणाच्या पाण्यात बुडवून मारा.
  • मीठ-चुना पद्धत: मोठ्या गोगलगायी प्लास्टिकच्या पोत्यात भरून त्यात कोरडे मीठ/चुना टाकून बंद करा. गोगलगायी मिठ/चुन्याच्या संपर्कात येऊन मरतील.
  • आमिष पद्धत: गवत/भाजीपाला अवशेषांचे ढीग तयार करून गुळाच्या पाण्यात भिजवून (by soaking) ठेवा. गोगलगायी आश्रयासाठी येतील आणि सूर्योदयानंतर त्यांचा नाश करा.
  • लहान गोगलगायीसाठी: मीठाची फवारणी किंवा कॅल्शियम क्लोराईडचा वापर करा.
  • तंबाखू/चुना बांध: शेताभोवती ५ सें.मी. रुंदीचा तंबाखू (tobacco) भुकटीचा/चुन्याचा पट्टा टाका.
  • झाडांवर बोर्डो पेस्ट: झाडाच्या खोडाला १०% बोर्डो पेस्ट लावल्यास गोगलगायी झाडावर चढत नाही.
  • मेटाल्डिहाईड (स्नेलकिल): गोगलगाय नाशकाचा वापर करा.
    • सोयाबीन/कापूस: २ किलो प्रति एकर
    • फळबाग: प्रति झाड १०० ग्रॅम
  • पपई/झेंडूसाठी: मेटाल्डिहाईडच्या गोळ्या पपईच्या पिवळ्या पानांजवळ ठेवा.
  • घरगुती आमिष:
    • १० लिटर पाणी, २ किलो गूळ आणि २५ ग्रॅम यीस्ट यांचे मिश्रण बनवा.
    • ५० किलो गव्हाच्या/भाताच्या कोंड्यात मिसळून १०-१२ तास आंबवून घ्या.
    • ५० ग्रॅम थायामिथोक्‍झाम (Thiamithoxam) मिसळा.
    • ढिगाच्या स्वरुपात किंवा बांधाच्या कडेने पट्टा स्वरुपात टाका.
      सावधानगिरी:
  • वरील उपाययोजना करताना प्लास्टिक हातमोजे घाला.
  • मुले आणि प्राण्यांना आमिषापासून दूर ठेवा.

एकत्रित प्रयत्न:

शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सामूहिकरित्या उपाययोजना केल्यास गोगलगायीचे नियंत्रण अधिक प्रभावीपणे होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button