lang="en-US"> Fruit Crop Insurance | नऊ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात ५३ कोटींची रक्कम जमा!

Fruit Crop Insurance | नऊ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात ५३ कोटींची रक्कम जमा!

Fruit Crop Insurance | ‘फळ पीकविमा योजना आंबिया बहार’अंतर्गत विमा काढलेल्या नऊ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात ५३ कोटींची रक्कम जमा होत आहे. २०२२ मध्ये ७८ हजार शेतकऱ्यांनी या योजनेत आपल्या पिकाचा (Fruit Crop Insurance) उतरविला होता.

यातील ५४ हजार शेतकऱ्यांना थेट बँक खात्यात पीक विम्याच्या नुकसानभरपाईचा लाभ मिळणार होता. त्यातील ४५ हजार शेतकऱ्यांना लाभ मिळाला असून, उर्वरित शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्याने लाभ दिला जात आहे.

काही महिन्यांपूर्वी नऊ हजार शेतकऱ्यांना ३० कोटी ७२ लाख रुपये वितरित करण्यात आले होते. त्यानंतरही काही शेतकरी विम्याच्या रकमेपासून वंचित होते. आता या नऊ हजार ६९० शेतकऱ्यांच्या खात्यात ५३ कोटी ७० लख रुपये जमा होत आहेत.

वाचा|बांधकाम कामगार योजनें’तर्गत कामगारांना आर्थिक सहाय्य ते ‘या’ सुविंधाचा मिळतोय लाभ, त्वरित करा नोंदणी प्रक्रिया

विमा नाकारलेल्या शेतकऱ्यांनाही मिळणार लाभ

विमा कंपनीने ११ हजार २२ शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ नाकारला होता. याबाबत खासदार रक्षा खडसे यांनी लोकसभेत प्रश्न उपस्थित करून जिल्हास्तरावर कमिटी स्थापन करून शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी केली होती.

त्यानुसार, पीक विम्याचा लाभ नाकारण्यात आलेल्या ११ हजार २२ शेतकऱ्यांपैकी आठ हजार १९० शेतकऱ्यांनी दाद मागून पुरावे सादर केले. यानंतर सहा हजार ६८६ शेतकऱ्यांना पीक विम्याच्या प्रलंबित लाभासाठी पात्र ठरविण्यात आले आणि त्यांना लाभ मिळाला आहे.

पीक विम्याचा लाभ प्रलंबित असलेल्या उर्वरित शेतकऱ्यांनाही लवकरच लाभ मिळणार असल्याची माहिती खासदार रक्षा खडसे यांनी दिली.

Web Title | Fruit Crop Insurance | 53 crores deposited in the accounts of nine thousand farmers!

हेही वाचा

Exit mobile version