ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
राशिभविष्य

Black Thread | तुम्हीही काळा धागा बांधताय? ‘या’ राशींच्या लोकांनी काळा धागा बांधल्यास होईल आर्थिकदृष्ट्या प्रगती, पण ‘या’ राशींसाठी अशुभ

समाजात आजूबाजूच्या लोकांच्या किंवा शेजार्‍यांच्या पायात किंवा हातात तुम्ही अनेकदा काळ्या रंगाचा धागा पाहिला असेल.

Black Thread | समाजात आजूबाजूच्या लोकांच्या किंवा शेजार्‍यांच्या पायात किंवा हातात तुम्ही अनेकदा काळ्या रंगाचा धागा पाहिला असेल. खासकरून हा काळा धागा लहान मुलांच्या पायात आणि हातात देखील बांधला जातो. असे म्हटले जाते की, काळा धागा पायात किंवा हातात जर बांधला, तर त्या व्यक्तीला दृष्ट लागत नाही. तसेच ती व्यक्ती वाईट गोष्टींपासून दूर राहते. यासाठी अनेकजण हा काळा धागा आपल्या पायात किंवा हातात बांधतो. इतकच नाही, तर अनेकजण काळा धागा आणि लॉकेट बनवून गळ्यामध्ये देखील घालतात. त्यांचे वाईट नजरांपासून आणि वाईट शक्तींपासून संरक्षण होईल. परंतु हा काळा धागा प्रत्येकासाठी शुभ असेलच असे नाही. कारण ज्योतिषी शास्त्रानुसार (Astrology काळा धागा शुभ नाही. तर अशा काही राशी (Horoscope) आहेत ज्यांच्यासाठी हा काळा धागा अशुभ मानला जातो. चला तर मग जाणून घेऊया या कोणत्या राशी आहेत ज्यांच्यासाठी हा काळा धागा अशुभ मानला जातो.

वाचा: Horoscope | या राशींच्या लोकांसाठी 31 दिवस असतील धोकादायक; संकट ओढविण्याचे लक्षणं, जरा जपून पाऊले टाका ..

कोणत्या राशींसाठी काळा धागा आहे अशुभ?
सर्वप्रथम कोणत्या राशींसाठी काळा धागा अशुभ मानला जातो हे पाहूया. त्यासह त्याच राशींसाठी का काळा धागा अशुभ मानला जातो त्याचे कारण देखील जाणून घेऊया. या काळ्या धाग्यामुळे त्या व्यक्तींना काय तोटा होतो किंवा त्यांचे काय नुकसान होते हे देखील सविस्तरपणे जाणून घेऊया.

Aries | मेष
खरं तर मेष या राशीचा शासक ग्रह हा मंगळ मनाला जातो. त्यासह मंगळ हा ग्रह काळ्या रंगाचा तिरस्कार करतो. त्यामुळे मेष राशी असलेल्या लोकांना हा काळा धागा शुभ नाही. तो त्यांच्यासाठी अशुभ ठरू शकतो. अशा परिस्थितीत मेष राशीच्या लोकांनी काला धागा टाळावा. नाहीतर नक्कीच त्यांच्या आयुष्यात काहीतरी विपरीत घडी शकते.

वाचा: Daily Horoscope | आज 13 फेब्रुवारी: फक्त या चार राशीच्या व्यक्ती ला होणार अनेक लाभ, पहा आजचे राशिभविष्य…

Scorpio | वृश्चिक
मेष राशीप्रमाणे वृश्चिक राशीच्या लोकांनी देखील काळा धागा बांधणे अशुभ आहे. कारण वृश्चिक राशीचा अधिपती हा मंगल देव आहे आणि मंगळ देवाला काळा रंग आवडत नाही. तर या राशीच्या लोकांनी काळा धागा घातल्यास मंगळाचा शुभ प्रभाव संपतो आणि अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे त्यांच्यासोबत काहीतरी वाईट घटना घडू शकते.

‘या’ राशींसाठी काळा धागा आहे शुभ
आता कोणत्या राशींसाठी काळा धागा अशुभ आहे हे पाहीले. त्यानंतर आता कोणत्या राशीसाठी काळा धागा शुभ मानला जातो ते पाहूया.

त्याचप्रमाणे तूळ, मकर, कुंभ राशीच्या लोकांसाठी काळा धागा शुभ मानला जातो. असे मत ज्योतिषशास्त्राने व्यक्त केले आहे. तसेच तूळ ही शनिदेवाची उच्च राशी आहे. त्याचप्रमाणे मकर आणि कुंभ राशीचा शासक ग्रह शनि आहे. यामुळे या राशींसाठी काळा धागा बंधने हे प्रचंड शुभ मानले जाते. या लोकांनी जर काळा धागा बांधला तर त्यांची आर्थिकरित्या प्रचंड प्रगती होईल. लवकरच नोकरी मिळेल. गरीबी टळून चांगले दिवस येतील.

(टिप: वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही.)

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा णि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button