lang="en-US"> Fish Farmer | मच्छिमार आणि मत्स्यपालकांसाठी आनंदाची बातमी! घरबसल्या मिळणार कर्ज!

Fish Farmer | मच्छिमार आणि मत्स्यपालकांसाठी आनंदाची बातमी! घरबसल्या मिळणार कर्ज!

Fish Farmer | लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांसाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून घोषणांचा पाऊस पाडला जात आहे. यातच आता मत्स्यपालक आणि मच्छिमारांसाठीही(Fish Farmer) एक दिलासादायक बातमी समोर आली आहे.

केंद्रीय मत्स्यव्यवसाय मंत्रालयातील सहसचिव सागर मेहरा यांनी सांगितले की, “देशभरातील मत्स्यपालक शेतकरी आणि मच्छिमारांना आता कर्ज मिळवण्यासाठी कोणत्याही बँकेत जाण्याची गरज नाही. त्यांना किसान क्रेडिट कार्ड (KCC) द्वारे कर्ज उपलब्ध होणार आहे.”

मेहरा यांनी पुढे सांगितले की, “हे कर्ज मत्स्यपालक आणि मच्छिमारांना घरबसल्या मिळेल. यासाठी केंद्र सरकारने ‘जन समर्थ पोर्टल’ नावाचे पोर्टल सुरू केले आहे.”

मत्स्यपालन विकासाला चालना मिळेल:

मेहरा यांनी सांगितले की, “सरकार मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील कर्ज प्रणाली डिजीटल करण्याचा प्रयत्न करत आहे आणि जन समर्थ पोर्टलद्वारे मत्स्यपालक आणि मच्छिमारांना कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या पोर्टलद्वारे मत्स्यपालन विकासालाही चालना मिळेल.”

आतापर्यंत ३ लाख नोंदणी:

मेहरा यांनी सांगितले की, “किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून मच्छीमार आणि मत्स्यशेती करणार्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचे काम सुरू आहे. यामुळे आतापर्यंत ३ लाख मत्स्यपालक आणि मच्छिमारांनी या योजनेसाठी नोंदणी केली आहे.”

वाचा | Land Buying And Selling | मोठा निर्णय! आता 5 गुंठे जमिनीची करता येणार खरेदी विक्री; पण या कामांसाठी घ्यावी लागेल जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी

पारदर्शकता आणि घरबसल्या सुविधा:

मेहरा यांनी सांगितले की, “जन समर्थ पोर्टल आणि किसान क्रेडिट कार्ड यांच्या एकत्रीकरणातून मत्स्यव्यवसायात पारदर्शकता आणण्याच्या एका नव्या युगाची सुरुवात होईल. देशभरातील मच्छीमार आणि मत्स्यपालक या माध्यमातून घरी बसून कर्जासाठी सहजपणे अर्ज करू शकतात आणि घरी बसूनच ऑनलाइन खातेही हाताळू शकतात.”

२५ हजार कोटी रुपयांच्या कर्जाचे उद्दिष्ट:

काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्रात आयोजित राष्ट्रीय किसान क्रेडिट कार्ड (KCC) परिषदेत केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री परशोत्तम रुपाला यांनी पशुपालक आणि मत्स्यपालकांना किसान क्रेडिट कार्डचे वाटप केले होते.

यावेळी रुपाला यांनी सांगितले होते की, “या योजनेमुळे ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होईल आणि जिल्हास्तरावरच किसान क्रेडिट कार्ड बनवताना येणाऱ्या अडचणी दूर केल्या जातील. या योजनेसाठी २५ हजार कोटी रुपयांच्या कर्जाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.”

महत्वाचे मुद्दे:

Web Title |Fish Farmer | Good news for fishermen and fish farmers! Get a loan from home!

हेही वाचा

Exit mobile version