ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

Crop Damage | शेतकऱ्यांसाठी खुशखबर! गारपीट व अवेळी पावसामुळे नुकसानीसाठी मदत वितरणास मान्यता, दिले ‘हे’ महत्त्वपूर्ण आदेश

Crop Damage | राज्यात सन 2021 व 2022 या कालावधीत गारपीट व अवेळी पावसामुळे शेतीपिकांचे नुकसान झाल्याचे निदर्शनास आले होते. तसेच कोविड 19 च्या प्रादुर्भावामुळे तसेच इतर काही कारणांमुळे निधी मागणीच्या काही प्रस्तावांवर कार्यवाही झाली नसल्याचे निदर्शनास आले होते. सदर नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान (Crop Damage) झाल्याने मा. मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील राज्य कार्यकारी समितीच्या दिनांक 31/03/2023 रोजी झालेल्या बैठकीतील निर्णयानुसार बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी निधी वितरीत करण्यात आला आहे.

वाचा: अरेरे ! दुधाच्या दरात कपात सुरूच ; दुग्ध उत्पादक चिंतेत …

शेतकऱ्यांसाठी दिले आदेश


सदर शासन निर्णयातील शेती पिके व बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठीची मदतीची रक्कम खातेदाराच्या बँक खात्यावर थेट जमा करताना मदतीच्या रकमेमधून कोणत्याही बँकेने कोणत्याही प्रकारची वसुली करू नये. यासाठी सहकार विभागाने आवश्यक ते आदेश निर्गमित करण्याचे निर्देश दिले आहेत. सदर निर्देशाच्या अनुषंगाने विभागामार्फत आदेश देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

वाचा: वाढत्या उन्हाचा पोल्ट्री व्यवसायिकांना फटका ! कोंबड्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले

शेतकऱ्यांना नुकसानीसाठी मदत


सन 2021 व 2022 या कालावधीत राज्यात गारपीट व अवेळी पावसामुळे शेती पिकांचे व बहुवार्षिक पिकांचे नुकसान झाल्याने निधीचे वाटप करताना विविध दक्षता घेण्याचे महसूल व वन विभागाच्या अन्वये निर्देश दिले आहेत. उक्त निर्देशाच्या अनुषंगाने या परिपत्रकान्वये सूचित करण्यात येते की, गारपीट व अवेळी पावसामुळे शेती पिके व बहुवार्षिक पिकाच्या नुकसानीसाठी वाटप केलेली मदतीची रक्कम खातेदारांच्या बँक खात्यावर जमा करताना मदतीच्या रक्कमेमधून कोणत्याही बँकेने कोणत्याही प्रकारची वसूली करू नये. याबाबतची अंमलबजावणी कटाक्षाने करण्यात येईल, याची सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी दक्षता घ्यावी.

Web Title: Good news for farmers! Approval of distribution of aid for damage due to hailstorm and unseasonal rain, given ‘This’ important order

हेही वाचा:

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button