ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

Fertilizer Rate | शेतकऱ्यांची चिंता वाढणार! खतांच्या किमतीत होणार वाढ?

Fertilizer | शेतीसाठी खत हे खूप महत्वाचं असत. परंतु नैसर्गिक वायूंच्या (Natural Gas Prices) वाढत्या किमतीमुळे जर्मनीच्या बीएएसएफ कंपनीने अमोनिया उत्पादनामध्ये (Ammonia Production) कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता पुढील वर्षात खतांच्या (Fertilizer Rate) किमतींमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होण्याची शक्यता आहे.

बीएएसएफ कंपनी ही जर्मनीमधील कंपन्यांपैकी एक आहे ही जगातील सर्वात मोठी खत उत्पादक (Fertilizer Producer) कंपनी आहे. ह्या कंपनीने नुकत्याच एका पत्रकार परिषदेत अमोनिया उत्पादनामध्ये कपात करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. बीएएसएफचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणाले की, “अमोनिया उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक वायूची आवश्यकता भासते. पण सध्या नैसर्गिक वायूंच्या वाढत्या किमतीमुळे अमोनियाचे उत्पादन हे खर्चिक झाले आहे त्यामुळे कंपनीने या उत्पादनात घट करण्याचा निर्णय घेतला आहे.”

नैसर्गीक वायूंच्या वाढत्या किमतीमुळे खत उत्पादन महाग होत आहे. त्याचा भार शेतकऱ्यांवर पडणार आहे. पुढच्या वर्षी खतांच्या किमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

वाचा: बाप रे! ‘या’ तीन पेयांमुळे तुमचा मेंदू लवकर होऊ शकतो वृद्ध, त्वरित जाणून घेऊन या पेयांचे सेवन थांबवा

आता जाणून घेऊयात किमती वाढण्याच कारण

तर मग कंपनीच्या म्हणण्यानुसार, युरोपमध्ये अनेक ठिकाणी खतांचे प्लांटस आहेत. तिथं अमोनिया उत्पादनासाठी लागणाऱ्या नैसर्गिक वायूच्या किंमतीमध्ये मोठया प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे २०२२ च्या दुसऱ्या महिन्यात नैसर्गिक वायूसाठी केलेल्या खर्चात ८० लाख युरोपियन पौंड्सची वाढ झाली आहे.

त्याच प्रमाणे रशियाच्या गॅझप्रॉमने जाहीर केल्यानुसार, जर्मनी आणि इतर मध्य युरोपियन देशांना नॉड स्ट्रिम पाईपलाईनद्वारे जो गॅस पुरवला जातो त्यात रशिया २०% टक्क्यांची घट करणार आहे. तसं पाहिलं तर जर्मनी रशियाकडून अंदाजे ५५ % नैसर्गिक वायूंची आयात करतो. यातला बहुतांश गॅस नॉडस्ट्रिम वन पाईपलाईनद्वारे पुरवला जातो. यारा इंटरनॅशनल या बहुराष्ट्रीय कंपनीनेही खत उत्पादनात कपात करणार असल्याची घोषणा केली आहे.

वाचा: बिग ब्रेकिंग: नितीन गडकरींची इलेक्ट्रिक वाहनांबाबत मोठी घोषणा, सामन्यांना होणार ‘हा’ फायदा

आता खतांच्या किमती कशा कमी होतील

तर मग हे जाणून घ्या जर शक्य असेल तर नैसर्गिक वायूला पर्याय म्हणून या ठिकाणी इतर ऊर्जा स्त्रोत जसं की इंधन तेलाचा वापर केला जाऊ शकतो का यावरही विचार चालू आहे. याच दरम्यान पुरवठ्यातील फरक दूर करण्यासाठी इतर काही पुरवठादारांकडून अमोनियाची खरेदी करता येते का यावरही कंपनीचे लक्ष आहे. तसेच जर नैसर्गिक वायूच्या तुटवड्यामुळे जर्मन सरकारने आणीबाणी जाहीर केली तरी बीएएसएफ कंपनीच्या लुडविगशाफेन या प्लांटवर उत्पादन सुरूच राहील असे कंपनीच्या वतीने या पत्रकार परिषदेत सांगण्यात येत आहे.

तसेच सरकारने जाहीर केलेल्या आणीबाणीचा परिणाम हा पुरवठ्यावर होऊ नये म्हणून इतर काही उत्पादक कंपन्यांनी देखील एकत्र येऊन भूमिका घेतली पाहिजे. जर्मन सरकारने जर तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यात आणीबाणीची घोषणा केली तर बीएसएफ च्या लुडविगशाफेन साइटवर उत्पादन सुरूच राहील, अशी माहिती बीएएसएफचे प्रमुख मार्टिन ब्रुडरमुलर यांनी दिली आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button