ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

Farmers Movement | शेतकऱ्यांचं पुन्हा दिल्ली धावायचं; 26 फेब्रुवारीला महामोर्चा! 7 धमाकेदार मागण्यांसह धर्मयुद्धाला सज्ज!

Farmers Movement | Farmers want to run to Delhi again; Great march on February 26! Get ready for the crusade with 7 explosive demands!

Farmers Movement | संयुक्त किसान मोर्चाने पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या देशव्यापी आंदोलनाचा कार्यक्रम आखला आहे. त्यांनी २६ फेब्रुवारी रोजी दिल्ली चलोची हाक दिली असून त्याच्या तयारीसाठी विविध भागात १५ किसान महापंचायती आयोजित करण्यात आल्या आहेत.

या (Farmers Movement) आंदोलनाच्या माध्यमातून संयुक्त किसान मोर्चा सात प्रमुख मागण्यांसाठी सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न करणार आहे. या मागण्यांमध्ये एमएसपीसाठी कायदा करणे, सर्व शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणे, शेतकऱ्यांची जमीन संपादन करण्यासाठी सन २०१३ साली जो कायदा केला आहे त्याची अंमलबजावणी करणे, सर्व कृषी उत्पादनांवरील आयात शुल्कात वाढ करणे, भारताने जागतिक व्यापार संघटनेतून बाहेर पडणे, वीज मंडळांचे खासगीकरण थांबवणे, कृषी आणि किरकोळ व्यापार फक्त लहान उद्योगांसाठी राखणे, ई-कॉमर्ससह कृषी आणि रिटेलच्या सर्व स्वरूपातील एफडीआयवर बंदी घालणे आणि शेतकऱ्यांना दरमहा पाच हजार रुपये पेन्शन देणे यांचा समावेश आहे.

वाचा : Anganwadi Movement | अंगणवाडी आंदोलनामुळे चिमुकल्यांची वाटचाल! शासन शोधतंय पर्यायी उपाय, पण तोडगा अद्याप लांबच!

या आंदोलनाच्या तयारीसाठी संयुक्त किसान मोर्चाने पहिल्या टप्प्यात सहा ठिकाणी किसान महापंचायती आयोजित करण्याचे ठरवले आहे. यामध्ये इंदूर (मध्य प्रदेश), भुवनेश्वर (ओरिसा), लुधियाना आणि मोगा (पंजाब), पलक्कड (केरळ), चेन्नई (तामिळनाडू) आणि बेंगळुरू (कर्नाटक) या शहरांचा समावेश आहे.

या किसान महापंचायतीमध्ये शेतकरी नेते आणि कार्यकर्ते एकत्र येऊन आंदोलनाची रणनीती आखतील. तसेच, सरकारला आंदोलनाच्या माध्यमातून आपल्या मागण्यांसाठी दबाव आणण्याचा प्रयत्न करतील.

या आंदोलनाच्या निमित्ताने संयुक्त किसान मोर्चाने देशाच्या लोकशाही आणि धर्मनिरपेक्ष मूल्यांचे रक्षण करण्यासाठी सर्वांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, सध्या सरकार लोकशाही आणि धर्मनिरपेक्ष मूल्यांवर हल्ला करत आहे. या हल्ल्याला सर्वांनी एकत्रितपणे विरोध करणे आवश्यक आहे.

या आंदोलनामुळे पुन्हा एकदा केंद्र सरकारला शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत विचार करावे लागणार आहे.

Web Title : Farmers Movement | Farmers want to run to Delhi again; Great march on February 26! Get ready for the crusade with 7 explosive demands!

हेही वाचा :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button