ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

Onion Export | अर्रर्र..! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कांद्याच्या निर्यातीचा फटका तर दलाल मालामाल; 15 रुपयांचा कांद्याला दुबईत 120 रुपये दर

Onion Export | महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यापारी संतप्त आहेत. कारण, कांद्याच्या निर्यातीवर (Onion Export) बंदी असतानाही संयुक्त अरब अमिराती (UAE) सारख्या बाजारपेठेत सरकारने परवानगी दिलेली काही शिपमेंट कवडीमोल भावात विकली गेल्या आहेत.

या शिपमेंटमध्ये विकल्या गेलेल्या कांद्याला शेतकऱ्यांना 12 ते 15 रुपये किलो असा किंमत मिळाली, तर तोच कांदा UAE मधील स्टोअरमध्ये 120 रुपये किलोने विकला जात आहे.

निवडणुकीच्या काळात वाढलेल्या कांद्याच्या भावामुळे सरकारने डिसेंबरमध्ये कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती. मात्र, काही देशांच्या विशेष मागणीनुसार सरकारने काही अटींवर निर्यातीला सूट दिली होती. याच सूटीनुसार UAE ला कांदा निर्यात करण्यात आला.

जागतिक बाजारपेठेत कांद्याची किंमत 300 ते 400 डॉलर प्रति टन आहे. तर UAE सारख्या प्रमुख बाजारपेठेतील किमती अलिकडच्या काही महिन्यांत 1500 डॉलर प्रति टनपर्यंत वाढल्या आहेत. भारतासह पाकिस्तान आणि इजिप्त यांनीही निर्यातबंदी लादल्याने किमतीत आणखी वाढ झाली आहे.

निर्यातदारांचे म्हणणे आहे की, UAE ला पाठवण्यात आलेल्या कांद्याची किंमत 500 ते 550 डॉलर प्रति टन होती. UAE मधील आयातदारांना या शिपमेंटद्वारे 300 कोटींहून अधिक नफा मिळाला आहे.

या संपूर्ण प्रकरणामुळे महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यापारी वर्गात तीव्र नाराजी आहे. सरकारने या प्रकरणाची दखल घेऊन शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याची मागणी होत आहे.

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button