ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

Kharif season | शेतकऱ्यांसाठी खुशखबर! राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना ‘हे’ बियाणे मिळणारं मोफत

शेतकरी जेव्हा शेतीत पिकवतो तेव्हा कुठे सर्वांना अन्नधान्याचा पुरवठा होतो. शेतकरी शेतीत (Agriculture) राब राब राबतो.

Kharif season | तेव्हा जनतेला पोषक आहार (Nutritious diet) मिळतो. मात्र, संपूर्ण जगाला अन्नधान्य (Cereals) पुरवणाऱ्या शेतकऱ्याचा आणि शेतकऱ्याच्या कुटुंबाचा विचार केला जात नाही. आता शेतकऱ्यांचा व त्यांच्या कुटुंबाचा राज्य शासन (State government) पुढाकार घेऊन विचार करत आहे. आता शेतकऱ्यांच्या आरोग्याचा (Health) विचार करता व खरीप हंगाम (Kharif season) तोंडावर येत असतानाच राज्य शासनाने शेतकऱ्यांना मोफत बियाणे देण्याचा विचार केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक 2022 पार पडली, त्याचवेळी हा निर्णय घेण्यात आला.

मुख्यमंत्री म्हणाले…
खरिप हंगाम बैठकीत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, “यांनी यंदा चांगला पाऊस होण्याचा अंदाज आहे, कृषी विभागाचे खरीप हंगामाचे नियोजन समाधानकारक आहे. यामुळे आपणा सर्वांच्या प्रयत्नाने आणि सहकार्याने यंदाचा खरीप हंगाम यशस्वी होईल,” असा विश्वास व्यक्त केला आहे. “शेतकरी बांधव आपल्या कुटुंबातले घटक आहेत. त्यामुळे यंत्रणेने आपुलकीने कुटुंबासारखे काम करावे. ‘विकेल ते पिकेल’ अभियान यशस्वी करण्यासाठी कृषी विभागाने शेतकरी बांधवांना मार्गदर्शन केले पाहिजे. रोग, किडींचा प्रादुर्भाव रोखण्याबरोबरच अतिवृष्टीचा सामना करण्यासाठी सतर्कता बाळगली पाहिजे. शेतमालाला हमी भाव आहे. पण हमखास भाव मिळाला पाहिजे,” असे देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हटले आहेत.

वाचाYojana | पशुपालकांना ‘या’ योजनेंतर्गत मिळतंय अर्थसहाय्य, जाणून घ्या ही महत्वाची योजना

शेतकऱ्यांना ‘हे’ बियाणे मिळणार मोफत
पुढे ते म्हणाले की, “शेतकरी बांधवांसमोर पीक विम्याचा प्रश्न आहे. पीक विमा समाधानकारक नाही. केंद्राकडे याबाबत पाठपुरावा सुरू आहे. याबाबत केंद्र सरकार विचार करत आहे,” असे देखील मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट कले आहे. राज्य शासनाकडून शेतकऱ्यांच्या आरोग्यासाठी पोषक गुणधर्म असलेल्या भाज्या आणि कडधान्यांचे 10 वाणांची पाकिटे मोफत देण्यात येणार आहेत.

काय म्हणाले अजित पवार?
खरिप हंगाम बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, ”राज्यातील शेतकरी बांधवांना खते, बियाणे वेळेत मिळाले पाहिजे. खते कमी दरात वेळेत मिळण्यासाठी कृषी विभागाने केंद्र सरकारच्या संपर्कात रहावे. यंदाचा खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी समन्वयाने काम करावे. कृषी विभाग योजनांसाठी सातत्याने पाठपुरावा करत असतो, ही बाब समाधानाची आहे. या विभागाला आवश्यक निधी उपलब्ध करू देण्यात येईल.”

वाचाDrip Irrigation Subsidy | शेतकऱ्यांसाठी खुशखबर! राज्य शासनाने ठिबक सिंचन अनुदानात केली तब्बल ‘इतकी’ वाढ

अन्नधान्य उत्पादनात झाली वाढ
खरं तर, राज्यामध्ये गतवर्षी मोठ्या प्रमाणात चांगला पाऊस पडला. याचमुळे पिका देखील जोमात आली होती. त्यामुळे अन्नधान्य उत्पादनात देखील मोठी झाली आहे. जवळपास या उत्पादनामध्ये 39 टक्के वाढ झाली आहे. यामुळे अन्नधान्य पिकाचे 165.02 लाख मेट्रिक टन इतके उत्पादन झाले आहे. तसेच यावर्षी देखील चांगलाच पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामुळे यावरशी देखील अन्नधान्याचे उत्पादन वाढ होण्याची शक्यता आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button