ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
ताज्या बातम्या

Farm Electricity Bill | वीजबिलाच्या धास्तीने नका होऊ कासावीस, त्वरा करा, ५०% विजमाफी योजनेसाठी उरले फक्त दिवस बावीस

Farm Electricity Bill | ‘कृषी धोरण २०२०’या योजने अंतर्गत राज्य शासनाने घोषित केलेल्या कृषी वीज पंप वीजबिल माफी योजनेची मुदत अवघ्या २२ दिवसांत समाप्त होणार आहे. थकीत बिलापैकी ५०% रक्कम शेतकऱ्यांनी अदा केल्यास उर्वरित ५०% रक्कम राज्य शासनातर्फे (State Gov.) माफ करण्यात येणार आहे.

येत्या ३१ मार्च रोजी या योजनेची मुदत संपणार असून एप्रिल पासून बिलात केवळ ३०% सवलत (Concession) मिळणार आहे. ‘आज भरू, उद्या भरू’या मानसिकते मुळे गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या या योजनेस शेतकऱ्यांनी हवा तितका प्रतिसाद दिलेला नाही. शेतकऱ्यांनी मुदत संपण्याची वाट न पाहता योजनेचा लाभ घ्यावा व वीजपुरवठा खंडित होण्याची नामुष्की टाळावी असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे.

वाचावायरल झालाय मेसेज…. नक्की काय लपवत आहे राज्य सरकार? मास्क न घालायच्या मागे निर्णय काय?

जाणून घ्या या योजनेचे स्वरूप..

५ वर्षांपूर्वीच्या म्हणजे चं सप्टेंबर २०१५ पूर्वीच्या थकबाकी वरील विलंब आकार व व्याज १००% माफ करून केवळ मूळ थकबाकीचं वसुलीसाठी ग्राह्य धरली आहे. धोरणात कृषीपंप ग्राहकांनी प्रथम वर्षी ५०% थकबाकी अदा केल्यास त्यांना ५०% अतिरिक्त सूट मिळणार असून दुसऱ्या वर्षी ३०% व तिसऱ्या वर्षी २०% सूट देण्यात येणार आहे.

महावितरणाचा वायदा, शेतकऱ्यांना मिळणार दुहेरी फायदा…

वीज समस्यातून शेतकऱ्यांची मुक्तता होण्यासाठी वसूली रकमेतील ६६% रक्कम वीजेच्या पायाभूत कामांसाठी वापरली जाणार आहे. वसूलीमुळे उपलब्ध झालेल्या ‘कृषी आकस्मिक निधीतून’अनेक वीज जोडण्या देण्याचे काम झाले आहे. तसेच नवीन रोहित्रे, उपकेंद्रे उभारणे व विद्युत पुरवठ्यासंदर्भातील विकास कामांसाठी या रकमेचा विनियोग करण्यात येणार आहे.

चालू बिले भरा, विद्युत पुरवठा सुरळीत ठेवा..
शेतकऱ्यांनी वीजबिले भरली तरचं त्यांना सुरळीत व पुरेश्या दाबाने वीज देणे महावितरणला शक्य होईल. वीज पुरवठा खंडित न होण्यासाठी चालू बिले वेळेवर अदा करावी व महावितरणास सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा णि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे हि वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button