lang="en-US"> Milk Subsidy | दूध उत्पादकांसाठी गोड बातमी! 52 हजार 951 उत्पादकांच्या - मी E-शेतकरी

Milk Subsidy | दूध उत्पादकांसाठी गोड बातमी! 52 हजार 951 उत्पादकांच्या खात्यावर तब्बल 6 कोटी 8 लाखांचे अनुदान जमा


Milk Subsidy | भिलवडी येथील प्रसिद्ध बी. जी. चितळे डेअरीने शासनाच्या ‘दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर 5 रुपये अनुदान‘ (Milk Subsidy) योजनेअंतर्गत 52 हजार 951 शेतकऱ्यांना 6 कोटी 8 लाख 78 हजार 590 रुपये थेट खात्यावर जमा केले आहेत.

संस्थापक श्रीपाद चितळे यांनी माहिती दिली की, शासनाने जनावरांच्या टॅगिंगसह प्रस्ताव तपासल्यानंतर चितळे डेअरीच्या 52 हजार 951 शेतकऱ्यांना या योजनेसाठी पात्र ठरवण्यात आले. 12 एप्रिलअखेर या शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम जमा करण्यात आली आहे. 15 एप्रिलपूर्वी पूर्ण प्रस्ताव दाखल करणाऱ्या उर्वरित शेतकऱ्यांनाही लवकरच अनुदानाची रक्कम मिळेल.

वाचा: खरीप हंगामासाठी महाबीजची बीजोत्पादन कार्यक्रम आरक्षण योजना; शेतकऱ्यांनो जाणून घ्या काय मिळणार फायदा?

चितळे डेअरीचे पशुसंवर्धन, विस्तार, दूध संकलन आणि लेखा विभागातील 70 कर्मचाऱ्यांनी जनावरांच्या टॅगिंग आणि इतर माहिती ऑनलाइन अपलोड करण्याचे काम वेळेत पूर्ण केले. उर्वरित जनावरांचे टॅगिंगही चितळे डेअरीकडून लवकरच पूर्ण केले जाईल.

हेही वाचा: सामान्यांना अच्छे दीन! सात महिन्यांनंतर गॅसच्या दरात 300 रुपयांची कपात

या योजनेमुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा हातभार लागणार आहे. चितळे डेअरीने शेतकऱ्यांना वेळेत आणि पारदर्शकपणे अनुदान रक्कम जमा करून शासनाच्या योजनेचा प्रभावीपणे अंमलबजावणी केली आहे.

Exit mobile version