ताज्या बातम्या

Dharashiva:’नाद’ खुळा… मद्यधुंद तलाठी कार्यालयात दिवसाच झोपला; रुग्णवाहिकेतून थेट रुग्णालयात दाखल

Dharashiva:धाराशिव: महसूल विभागातील अत्यंत महत्वाचा आणि जबाबदार कर्मचारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तलाठी पदाचा वारंवार गैरवापर होत असल्याचे दिसून येते. अनेकदा लाचखोरी आणि बेजबाबदारीचे आरोप तलाठ्यांवर येत असतात. आता तर, धाराशिव जिल्ह्यातील परंडा तहसील कार्यालयात (In Tehsil Office) मद्यधुंद अवस्थेत तलाठी आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

गुणाजी ढोणे नावाचा हा तलाठी मंगळवारी (20 जून) सकाळीच मद्यधुंद (Drunk) अवस्थेत कार्यालयात आला. त्याचा नशेमुळे बिथंबलेला अवतार पाहून कार्यालयात खळबळ उडाली. तलाठी ढोणे हे कार्यालयातील जाण्यायेण्याच्या मुख्य मार्गावरच नशेमध्ये धुंद झालेले दिसून आले. यामुळे अनेक कर्मचारी आणि नागरिक घटनास्थळी जमा झाले.

वाचा : E-Peak Inspection |शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आता शेतात बसून करता येईल पीकपेऱ्यांची नोंद!

तेव्हा, तहसील प्रशासनाने तात्काळ रुग्णवाहिका (Ambulance) बोलावून ढोणे यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. ढोणे हे गेल्या अनेक वर्षांपासून परंडा तहसील कार्यालयात कार्यरत आहेत. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून ते कोणत्याही सूचना न देता गैरहजर राहत होते. त्यांच्या गैरहजरीमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. ढोणे यांना नोटीस बजावण्यात आली होती, पण त्यांनी त्यालाही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे, तहसीलदारांनी ढोणे यांच्या निलंबनाचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे (District Collector) पाठवला आहे.

यापूर्वीही ढोणे यांनी दारू पिऊन कार्यालयात येण्याचा प्रकार केल्याची माहिती आहे. या घटनेमुळे तहसील प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे आणि ढोणे यांच्यावर कडक कारवाईची मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button