ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा! शेतकऱ्यांना एकर जमिनीला देणार 75 हजार रुपये, जाणुन घ्या सविस्तर

Devendra Fadnavis | शेतकऱ्यांसाठी आता एक आनंदाची बातमी समोर आली आहे. झोपून खा नाहीतर लोळून अशी गंमत आता शेतकऱ्यांची होणार आहे. काम करू अथवा ना करो तरीही शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहेत. कारण आता शेतकऱ्यांची जमीन सौर ऊर्जेसाठी राज्य सरकार (Devendra Fadnavis) भाड्याने घेणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना त्याचा मोबदला मिळणार आहे. अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले आहे. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या शेतकऱ्यांना लाभ मिळू शकते.

वाचाYojana | शेतकऱ्यांसाठी खुशखबर! आता शेळीपालनासाठी 100 टक्के अनुदान, ‘या’ दोन योजनांना मंजुरी

शेतकऱ्यांना मिळणार 12 तास वीज
शेतकऱ्यांची जमीन म्हणावा तशी पिक्त नाही, दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना पुरेशी विज मिळत नाही. म्हणूनच राज्यामध्ये शेतकऱ्यांना 12 तास विज देण्यासाठी सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांना 12 तास वीज उपलब्ध होणार आहे. यासाठी लागणारी जमीन शेतकऱ्यांकडून राज्य सरकार थेट भाड्यानेच घेणार आहे.

राज्य सरकार जमीन घेणार भाड्याने
शेतकऱ्यांना 12 तास वीज मिळावी म्हणून राज्यात अॅग्रीकल्चर फीडर बसवण्यात येणार आहेत. हे सर्व फिडर सोलरवर चालवण्यात येणार आहेत. यानंतर शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज देण्यात येईल, हे काम यावर्षी सुरु करण्यात येत आहे. तसेच या अॅग्रीकल्चर फीडरसाठी राज्य सरकार शेतकऱ्यांची जमीन भाड्याने घेणार आहे.

वाचा: आता शेतकऱ्यांची फसवणुक थांबणार! ‘या’ सॉफ्टवेअरमुळे बनावट अंगठ्यांना बसणार आळा

किती मिळणार जमिनीला भाडे?
शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये काही पिको अथवा ना पिको तरी देखील सरकार त्यांची जमीन तब्बल 30 वर्षे भाड्याने घ्यायला तयार आहे. सरकारने जरी जमीन भाड्याने घेतली तरी शेतीचे मालक शेतकरीच असणार आहेत. शेतकऱ्यांना प्रति एकर वर्षाला 75 हजार रुपये भाडे देण्यात येणार आहे. इतकचं नाही, तर दर वर्षाला 2 टक्क्यांनी वाढ करण्यात येणार आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Big announcement of Devendra Fadnavis! 75 thousand rupees will be given to farmers for an acre of land, know in detail

५ Comments

  1. माझी अडीच एकर जमीन सौर ऊर्जेसाठी भाडेतत्त्वावर देणे आहे बारामती तालुक्यात लोणी भापकर येथे

  2. मी दोन वर्षांपूर्वी अधिकृत अर्ज केला होता परंतु विद्युत मंडळाने अद्याप यावर निर्णय घेतला नाही

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button