शासन निर्णय

New Delhi|: 5 जुलैपासून तुमच्या जीवनात होणारे बदल!

New Delhi| 1 जुलै 2024: जुलै महिना अनेक महत्त्वपूर्ण बदलांसह आला आहे ज्याचा तुमच्या जीवनावर थेट परिणाम होणार आहे. गॅस सिलेंडर स्वस्त, रिचार्ज महाग, सिमसाठी 7 दिवस प्रतीक्षा आणि बँकिंगमध्ये बदल असे अनेक बदल 5 जुलैपासून लागू होत आहेत.

1. गॅस सिलेंडर 31 रुपयांनी स्वस्त:

  • 19 किलोचा व्यावसायिक गॅस सिलेंडर आजपासून 31 रुपयांनी स्वस्त झाला आहे.
  • दिल्लीत सिलेंडरची किंमत आता 1646 रुपये झाली आहे, तर मुंबईत 1598 रुपये आणि चेन्नईत 1809.50 रुपये आहे.
  • 14.2 किलो घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत बदल नाही.

वाचा:Scheme Beneficiary|महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजने लाभार्थी निवड प्रक्रिया सुरू! 1 जुलैपासून अर्ज स्वीकार

2. सिम चोरी झाल्यास 7 दिवस प्रतीक्षा:

  • सिम कार्ड चोरी किंवा खराब झाल्यास आता नवीन सिम मिळण्यासाठी 7 दिवस वाट पाहावी लागेल.
  • पूर्वी सिमकार्ड त्वरित उपलब्ध होते.

3. PhonePe, Cred द्वारे क्रेडिट कार्ड पेमेंट बंद:

  • तुम्ही PhonePe, Cred, BillDesk सारख्या फिनटेक ॲप्सद्वारे 26 बँकांचे क्रेडिट कार्ड पेमेंट करू शकणार नाही.
  • 30 जूनपासून सर्व क्रेडिट कार्ड पेमेंट्स भारत बिल पेमेंट सिस्टम (BBPS) द्वारे केले जातील.

4. Hero वाहने 1,500 रुपयांनी महाग:

  • Hero MotoCorp च्या काही निवडक वाहनांच्या किमती 1,500 रुपयांनी वाढल्या आहेत.
  • वस्तूंच्या किमती वाढल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

5. टाटा वाहने 2% महाग:

  • टाटा मोटर्सच्या वाहनांच्या किमती 2% ने वाढल्या आहेत.
  • वाढ वेगवेगळ्या मॉडेल्स आणि व्हेरियंटनुसार बदलते.

6. जिओ, एअरटेल, व्होडाफोन रिचार्ज महाग:

  • जिओ, एअरटेल,आणि व्होडाफोन ने त्यांचे रिचार्ज प्लॅन महाग केले आहेत.
  • जिओ आणि चे एअरटेल प्लान 3 जुलैपासून महाग होतील, तर Vodafoneचे 4 जुलैपासून.

7. 3 वर्षे व्यवहार नसलेली बँक खाती बंद:

  • जर तुमचे पंजाब नॅशनल बँकेत खाते असेल आणि तुम्ही 3 वर्षांपेक्षा जास्त काळ कोणताही व्यवहार केला नसेल तर ते खाते बंद केले जाईल.
  • अशा खातेदारांना 30 जूनपर्यंत KYC पूर्ण करण्यास सांगितले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button