ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

Onion Subsidy| शेतकऱ्यांनो, कांदा अनुदानच्या अर्जासाठी मुदतवाढ, ‘या’ तारखेपर्यंत करता येणार अर्ज

Onion Subsidy| नेहमीच अडचणीत येणारा शेतकरी म्हणजे कांदा उत्पादक शेतकरी. कांद्याच्या दरात नेहमीच चढ-उतार होत असते यामुळे कांदा उत्पादक शेतकरी कधी अडचणीत येईल सांगता येत नाही. त्यामुळे सरकार कांदा शेतकऱ्याला अनुदान देत असतं. राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना 2022-23 या वर्षात प्रति क्विंटल 350 रुपये अनुदान राज्य शासनानं जाहीर केलं आहे. त्यासाठी अर्जा करण्यात मुदतवाढ देण्यात आली आहे. आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांना 30 एप्रिलपर्यंत अर्ज करता येणार आहेत. अर्ज करण्यापासून कुणीही वंचित राहू नये म्हणून पणन संचालक कार्यालयातर्फे मुदतवाढ देण्याचा आदेश काढण्यात आला आहे.

वाचा विक्रमी सुवर्ण! सोन्याने गाठला उच्चांक, चांदीच्या दरातही वाढ, असे आहेत आजचे दर

काय आहे आदेश

2022-23 या वर्षात विक्री केलेल्या कांद्याला 350 रुपये अनुदान जाहीर झालं होतं. यासाठी 3 एप्रिल ते 20 एप्रिल पर्यंत अर्ज करण्याची मुदत होती. मात्र अनेक जण या अनुदानापासून वंचित राहण्याची शक्यता असल्यानं पणन कार्यालयानं आता एक नवीन आदेश काढला आहे. यानुसार या अर्जाची मुदत आता 30 एप्रिल करण्यात आली आहे. मुदतवाढीची आता शेवटची संधी शेतकऱ्यांना मिळाली आहे. ज्या ठिकाणी कांदा विक्री केला, त्या कृषी उत्पन्न बाजार समिती, खाजगी बाजार, नाफेड खरेदी केंद्र प्रमुख यांच्याकडे अर्ज वेळेत सादर करावेत. आता पुन्हा मुदतवाढ मिळणार नाही.  असं पणन संचालक विनायक कोकरे यांनी सांगितलं आहे.

इतकं मिळणार अनुदान

राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये, खाजगी बाजारात किंवा नाफेडमध्ये 1 ते 31 मार्च पर्यंत विकलेल्या कांद्याला हे अनुदान देण्यात येणार आहे या अनुदानाची मर्यादा 200 क्विंटल पर्यंत आहे. यासाठी प्रतिक्विंटल 350 रुपये इतकं अनुदान मिळणार आहे. कांदा अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी विहीत नमुन्यातील अर्ज भरून द्यावा लागणार आहे.

वाचाखुशखबर! सरकारचा शेतकरी हिताचा मोठ्ठा निर्णय, ‘इतके’ दिवस पाऊस पडल्यास समजली जाणार नैसर्गिक आपत्ती; शेतकऱ्यांना होणार फायदा

अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे

कृषी उत्पन्न बाजार समित्या, खाजगी बाजार, पणन परवानाधारक, नाफेड, जिल्हा उपनिबंधक, तालुका निबंधक आणि सहकारी संस्था या ठिकाणी हा अर्ज उपलब्ध आहे. या अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी बँक पासबुक व आधार कार्डची झेरॉक्स, कांदा पिकाची नोंद असलेला सातबारा, कांदा विक्रीची मूळ पट्टी आणि जर ही विक्री पट्टी इतर कोणाच्या नावे असेल तर मूळ मालकाचं शपथपत्र इत्यादी कागदपत्रांची आवश्यकता आहे.

हेही वाचा:

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button