ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

Crop Insurance | शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाचा धडाकेबाज निर्णय! फक्त एकाच रुपयात निघणार पिक विमा, जाणून घ्या घोषणा

Crop Insurance | केंद्र सरकार आणि राज्य सरकार विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रोत्साहन करण्याचे काम करते. नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना ‘प्रधानमंत्री पिक विमा योजने’अंतर्गत आर्थिक सहाय्य मिळते. यासाठी शेतकऱ्यांना आपल्या पिकाचा विमा (Crop Insurance) उतरावा लागतो. नुकताच आज राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनात अर्थसंकल्प जाहीर केला. त्याचवेळी पिक विम्याबाबत (Crop Insurance) त्यांनी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे.

शेतकऱ्यांना आता पिक विमा काढण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागणार नाहीत. शेतकऱ्यांना पिकानुसार पिक विमा काढण्यासाठी क्लेम करावा लागत होता. प्रत्येक पिकासाठी वेगवेगळे पैसे मोजावे लागत होते. परंतू, आता प्रत्येक पिकाचा पिक विमा काढण्यासाठी शेतकऱ्यांना फक्त एकच रुपया मोजावा लागणार आहे. शेतकऱ्यांसाठी हा एक व पूर्ण आणि दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. ज्याची घोषणा आजच्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांसाठी धडाकेबाज निर्णय
शेतकऱ्यांसाठी पिक विम्याचा प्रीमियम भरण्यासाठी राज्य शासनाने आता पुढाकार घेतला आहे. राज्य शासनाच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांवर आता पिक विम्याचा प्रीमियम भरण्याचा भार उरणार नाही. कारण आता फक्त एकाच रुपयांमध्ये पिक विमा निघणार आहे. शिंदे आणि फडणवीस सरकारकडून प्रथमच हा अर्थसंकल्प सादर होत आहे. या अर्थसंकल्पाकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले होते. या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी एकापेक्षा एक धडाकेबाज निर्णय घेण्यात आले आहेत.

राज्य सरकार उचलणार कोट्यवधीचा भार
शेतकऱ्यांना फक्त एकाच रुपयात पिक विमा काढता येणार आहे. परंतु राज्य सरकारला या निर्णयामुळे कोट्यावधींचा भार उचलावा लागणार आहे. कारण याचा बोजा थेट सरकारी तिजोरीवर पडणार आहे. तर शेतकऱ्यांसाठी राज्य सरकार 3 हजार 312 कोटी रुपयांचा भार उचलणार आहे. याचमुळे शेतकरी आता 1 रुपयांमध्ये पीक विमा काढू शकणार आहेत.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: The bold decision of the state government for farmers! Crop insurance will be issued in just one rupee, know in detail

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button