ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी सल्ला

Cotton Management | शेतकऱ्यांनो कपाशी पिकावरील किड करतेय नुकसान? तर ‘अशा’पद्धतीने करा व्यवस्थापन

Cotton Management | पिकांवर होणाऱ्या रोग आणि किडींच्या प्रादुर्भावामुळे ( Infestation) उत्पादनात (Yield) घट होत असते. कपाशीच्या बीटी वरायटी जरी वापरले तरी सुद्धा रोग आणि किडींचा प्रादुर्भाव त्यावरती होत असतो. कपाशीवर रसशोषण (Sucking Pests) करणाऱ्या मावा, तुडतुडे, फुलकिडे, पांढरी माशी, पिठ्या ढेकूण इत्यादी किडींचा सुरुवातीच्या वाढीच्या काळात अधिक प्रादुर्भाव दिसतो. यासर्व किडींमुळे कपाशीचे उत्पन्न जवळपास 50 ते 60 टक्के घटते. नियंत्रण (Control) करताना किटकनाशकांच्या ( Pesticides) फवारणीच्या संख्येत आणि खर्चामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असते. सध्या बीटी ( B.T Cotton) कपाशीवर सर्वांत जास्त मोठी समस्या आहे ती म्हणजे रसशोषण करणाऱ्या किडींची आणि गुलाबी बोंडअळीची (Pink bollworm). खालील लेखात जाणून घेऊ काही महत्त्वाचे कपाशीवरचे कीड व्यवस्थापन.

Management of Insects and pests of Cotton | कपाशी पिकावरील कीड व्यवस्थापन-

White fly ( Bemisia tabaci) | पांढरी माशी –
पांढरी माशी एक रसशोषक ( Sucking Pest ) कीड आहे. या माश्या पानांच्या खालच्या पृष्ठभागावर राहतात आणि वनस्पतींना कमकुवत करण्यासाठी रस शोषून घेतात. या माश्यांनी वनस्पतींवर चिकट पदार्थ सोडले तर बुरशी तयार होते.

Management | व्यवस्थापन
हे टाळण्यासाठी पीक कवच अनुसरण करा आणि एकरी 2-3 सापळे तयार करा. जर पिकात पांढरा माशीहल्ला दिसला तर 200 लिटर पाण्यात 75% डब्ल्यूयूपी 800 ग्रॅम, थाइमथोक्झम 40 ग्रॅम तर इमिडाक्लोरपिड 40 मिली हे 200 लिटर पाण्यात मिसळून एक एकरीप्रमाणे फवारणी करणे आवश्यक आहे.

American Boll worm (Helicoverpa armigera) | अमेरिकन अळी

ही अळी पाने पोखरणारी अळी आहे. कापसाच्या पानावरच ही प्रादुर्भाव करीत असल्याने वाढ तर खुंटतेच पण उत्पादनावर देखील परिणाम होतो. ही एकटी अळी 30-40 कापसाचे नुकसान करू शकते. हे हल्ले तपासण्यासाठी लाइट कार्ड किंवा फेरोमोन कार्ड वापर करता येतो. कापूस लागवडीपूर्वी तणनाशकाची फवारणी गरजेची आहे.

Management | व्यवस्थापन
हिरव्या बोंडअळीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास लॅम्बडा सायहॅलोथ्रिन 4 ते 5 मि. लि. किंवा स्पीनोसॅड 2 ते 3 मि. लि. किंवा क्विनॉलफॉस 20 मि. लि. किंवा प्रोफेनोफोस 10 मि. लि. प्रती 10 लीटर पाण्या मिसळून फवारणी करावी शिवाय दरवर्षी केवळ कापसाचीच लागवड न करता पीक पध्दतीमध्ये बदल करणे आवश्यक आहे. रासायनिक खतांचा वापर हा कमी करावा.

Pink Bollworm (Pectinophora gossypiella) | गुलाबी बोंड अळी –

हे किटक वनस्पतींचे खोड, फांद्या, पानांचा रस शोषून वनस्पतींना कमकुवत करते. या किडीची अळि सुरवातीला पात्या, फुले व काळ्या यावर उपजीविका करते. अळि फुले किंवा बोंडे यांना बारीक छिद्र करून आत शिरते. प्रादुर्भावग्रस्त पाती व बोंडे गळून पडतात. याच बरोबर फुले अर्धवट उमललेल्या गुलाबाच्या कळीसारखी दिसतात. बोंडामधील अळि बियांना छिद्र करून सरकी खाते. त्यामुळे रुईची प्रत खराब होते तसेच सरकीतील तेलाचे प्रमाण देखील कमी होते.

Management | व्यवस्थापन
नियंत्रण ठेवण्यासाठी कडुनिंबाच्या तेलाची फवारणी करून या किडीपासून सुटका करून घेऊ शकता. त्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असेल तर प्रोफेनोफोस 500 मिली हे 150 लिटर पाण्यात मिसळून एकरी फवारणी करावी.

Cotton Aphids (Aphis gossypii) | माहू कीटक
हा कीटक हिरवा किंवा फिक्कट पिवळ्या रंगाचा असतो. पानांच्या खालच्या पृष्ठभागाचा रस शोषून वनस्पतींना कमकुवत करते. त्यामुळे पिकाचे खूप नुकसान होते.

Management | व्यवस्थापन –
नियंत्रण ठेवण्यासाठी एकरी 3 मिली आयमिडाक्लोपीडी जमिनीत घालून या किडीपासून सुटका करून घेण्यासाठी फवारणी केली जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button