योजना

Scheme Beneficiary|महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजने लाभार्थी निवड प्रक्रिया सुरू! 1 जुलैपासून अर्ज स्वीकार

Scheme Beneficiary|सोलापूर, 30 जून 2024: महाराष्ट्र सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया 1 जुलैपासून सुरू होणार आहे. या योजनेद्वारे पात्र (deserve) महिलांना दर महिन्याला ₹1500 आर्थिक मदत मिळणार आहे.

पात्रता:

  • महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी (resident) असणे आवश्यक
  • वय 21 ते 60 वर्षे
  • विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या, निराधार महिला
  • अर्जदार महिलांचे बँक खाते असणे आवश्यक
  • अर्जदार महिलेच्या कुटुंबांचे एकत्रित वार्षिक उत्पन्न ₹2.5 लाखांपेक्षा जास्त नसावे
  • ट्रॅक्टर वगळून चारचाकी वाहन नसावे
  • इतर कोणत्याही आर्थिक मदत योजनेतून लाभ घेत नसणे

वाचा :Rain in Maharashtra |मध्य महाराष्ट्रात डांगी पावसाचा जोर वाढणार, काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता!

अर्ज कसा भरायचा:

  • ऑनलाइन संकेतस्थळावर किंवा अंगणवाडी केंद्रात, बाल विकास प्रकल्प (Child Development Project)अधिकारी कार्यालये, ग्रामपंचायत व महापालिकेचे वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्र व महा- इ- सेवा केंद्रे येथे अर्ज मिळू शकतात.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जमा करणे बंधनकारक आहे.
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 जुलै आहे.

प्रक्रिया:

  • 16 ते 20 जुलै: प्रारूप निवड यादी प्रकाशित
  • 21 ते 30 जुलै: प्रारूप यादीमध्ये हरकत, तक्रार
  • 1 ऑगस्ट: लाभार्थी अंतिम निवड यादी प्रकाशित
  • 14 ऑगस्ट: लाभ देण्यास सुरुवात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button