ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
हवामान

Agricultural Advice | अवकाळी पाऊस शेतकऱ्यांची पाठ सोडेना! ‘या’ तारखेपर्यंत होणार पाऊस, पीक वाचवण्यासाठी जाणून घ्या कृषी सल्ला

Agricultural Advice | सध्या राज्यामध्ये अवकाळी पावसाने मान घातल्यामुळे शेतकऱ्यांची पिके धुळीला मिळाली आहे. अगदी अवकाळी पाऊस शेतकऱ्यांची पाठ सोडेनासा झाला आहे. अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे (Agricultural Advice) नुकसान झाले आहे. पण तरीही हवामान विभागाकडून 26 तारखेपर्यंत राज्यात अवकाळी पाऊस थैमान घालणार असल्याचे माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पीक निहाय कृषी सल्ला (Agricultural Advice) जाणून घेणे महत्वाचं आहे.

वाचाब्रेकिंग! ‘या’ जिल्ह्यातील कृषी यांत्रिकीकरणाचे तब्बल 4 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा, त्वरित तपासा

कृषी सल्ला
काही ठिकाणी झालेल्या पाऊस व गारपिटीमुळे नुकसान झालेल्या संत्रा, मोसंबी, आंबा, भाजीपाला,
टरबूज, खरबूज, वांगी, टोमाटो व इतर गळालेली फळे वेचून नष्ट करावी. भाजीपाला व फळबागांमध्ये बुरशीजन्य व
जीवाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शिफारशीतील बुरशीनाशके व जीवाणूनाशकाची स्वच्छ हवामान
परिस्थिती असताना फवारणी करावी. पावसाचा अंदाज लक्षात घेता रब्बी हंगामातील परिपक्व अवस्थेतील (हरभरा,
गहू, मोहरी, जवस इत्यादी.)

तात्काळ करा काढणी
पिकाची काढणी व मळनीची कामे तत्काळ उरकून घ्यावी. कापणी व मळणीच्या
कामास पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नसल्यास कम्बाईन हार्वेस्टरद्वारे काढणीची कामे करून घेण्यास प्राधान्य द्यावे. कापणी झाली असल्यास व पिक शेतामध्ये पसरले असल्यास शेतामध्ये उंचवटा असलेल्या ठिकाणी जमा करून
ताडपत्री किंवा प्लास्टिक शीटच्या सहाय्याने शेतमाल झाकून ठेवावा. कापणी व मळणी केलेला शेतमाल
पावसाच्या संपर्कात येणार नाही याची काळजी घ्यावी.

वाचाशेतकऱ्यांसाठी खुशखबर! ‘या’ ताखेला खात्यात जमा होणार पीएम किसानचा 13वा हप्ता; त्वरित जाणून घ्या

शेतकऱ्यांनी ‘अशी’ घ्यावी काळजी
मेघगर्जनेसह विजांची शक्यता लक्षात घेता शेतामध्ये काम
करत असताना दोन व्यक्तींमध्ये जास्तीत जास्त अंतर ठेवावे. मेघगर्जनेची चाहूल लागताच तात्काळ सुरक्षित
ठिकाणी आसरा घ्यावा. झाडांखाली आसरा घेणे कटाक्षाने टाळावे. शेळ्या, गाय, म्हैस व इतर पाळीव जनावरांना
झाडाखाली न बांधता त्यांना सुरक्षित ठिकाणी बांधावे. जनावरांना मोकळ्या जागेत चारावयास सोडण्याचे टाळावे
तसेच गोठया मधेच चारा व पाण्याची उपलब्धता करून घ्यावी. गोठ्याची देखभाल आणि दुरुस्तीची कामे 2
दिवसामध्ये पूर्ण करावी.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Unseasonal rain does not leave the back of the farmers! Know the agricultural advice to save the crop till date

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button